सात शिक्षक मृत्युमुखी पडले असतानाही सोपवले कोरोनाचे काम, अनेक बाधित... - even though seven teachers died coronas work is handed over many are affected | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सात शिक्षक मृत्युमुखी पडले असतानाही सोपवले कोरोनाचे काम, अनेक बाधित...

मंगेश गोमासे
गुरुवार, 1 एप्रिल 2021

रुग्णाच्या घरी गेल्यानंतर माहिती विचारताना शिक्षकांना वाईट अनुभव येत असल्याची प्रकरणे घडली आहेत. अनेक रुग्ण आमची बदनामी करीत आहात काय, असा सवाल करतात. तर काही जण कोरोना नसल्याचे सांगून हाकलून लावतात. पालिकेतील चपराशी शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देतो, अशी माहिती समोर आली आहे. 

नागपूर : कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत चालला आहे. गेल्या वर्षीपेक्षाही भयावह स्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. त्यातच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम शिक्षकांवर सोपवल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. गंभीर बाब म्हणजे ७ शिक्षकांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे आणि अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. 

कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे आदेश आल्याने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे ७ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात दररोज किमान तीन हजारावर रुग्ण आढळून आले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यातूनच घराघरांमध्ये असलेले रुग्ण, त्यांच्या संपर्कात असलेल्या १५ व्यक्ती आणि आजूबाजूच्या १५ व्यक्तींची माहिती मिळविणे, त्यांची तपासणी करणे, त्यांच्याबाबत माहिती देणे, नोंदी ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. 

ग्रामीण भागांत या कामाची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांवर आहे. आता शहरी भागांत शिक्षकांना घरोघरी भेटी द्याव्या लागत आहे. होमक्वारंटाइन रुग्णांच्या घरी भेट देणे, त्यांच्या आरोग्याची माहिती घेणे व त्याची नोंद ठेवणे हे काम शिक्षकांना करावे लागत आहे. रुग्णांकडे व्यवस्था नसल्यास त्यांना रुग्णवाहिकेची सोय करून देण्याचेही काम त्यांना देण्यात आले आहे. यामुळे शिक्षक संघटनांमध्ये रोष आहे. ज्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे त्यांनाही यात गुंतवल्याचे दिसून येते. आत्तापर्यंत बऱ्याच शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

तपासणीदरम्यान वाईट अनुभव 
रुग्णाच्या घरी गेल्यानंतर माहिती विचारताना शिक्षकांना वाईट अनुभव येत असल्याची प्रकरणे घडली आहेत. अनेक रुग्ण आमची बदनामी करीत आहात काय, असा सवाल करतात. तर काही जण कोरोना नसल्याचे सांगून हाकलून लावतात. पालिकेतील चपराशी शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देतो, अशी माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा : भाजपच्या तडाख्यात कॉंग्रेसची टीम सांभाळणारा शहराध्यक्ष कॉंग्रेसला मिळेल का ?

शिक्षकांच्या सेवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह अन्य कामांसाठी घेण्यात येत आहेत. रुग्णांना औषधाचे वाटप करणे, हातावर स्टॅम्प मारणे व संपर्कातील तीस लोकांना शोधण्याच्या कामामुळे बरेच शिक्षक पॉझिटिव्ह झाले आहेत. यात काही जणांचा मृत्यूही झाला आहे. शिक्षकांच्या जिवाची प्रशासनाला पर्वा नाही, असे वाटते आहे. 
- अनिल शिवणकर, भाजप शिक्षक आघाडी.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख