कोरोनाच्या मृतदेहांचे बेवारस कुत्र्यांनी तोडले लचके, नीलम गोऱ्हेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र… - even after the death of corona patients neelam gorhe gave letter to the district collector | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या मृतदेहांचे बेवारस कुत्र्यांनी तोडले लचके, नीलम गोऱ्हेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र…

अभिजित घोरमारे
बुधवार, 14 एप्रिल 2021

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मृतदेह पूर्णपणे जळाल्यानंतरच स्मशानभूमी सोडावी आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी. या घटनेची वस्तुस्थिती तपासून जिल्हा प्रशासनाने तत्काळ याबाबतच्या उपाययोजना कराव्या.

भंडारा : जिल्ह्यातील करचखेडा (भिलेवाडा) येथे कोरोना रुग्णांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत सोडून देण्यात आले होते. मृतदेहांचे तुकडे कुत्र्यांनी लचके तोडून गावात आणले होते. या घटनेचे वृत्त बाहेर येताच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेऊन भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. 

करचखेडा येथे कोरोना रुग्णांचे अर्धवट जळलेले मृतदेह कुत्र्यांनी गावात आणल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आल्याचे वास्तव ११ एप्रिल २०२१ रोजी समाजमाध्यमांद्वारे समोर आले होते. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. मात्र, बाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही हाल होत असल्याची बाब माध्यमांनी छापली होती. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अर्धवट जळलेले मृतदेह बेवारस कुत्रे गावात आणून त्यांचे लचके तोडत आहेत. याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मृतदेह पूर्णपणे जळाल्यानंतरच स्मशानभूमी सोडावी आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले आहेत. उपरोक्त घटनेची वस्तुस्थिती तपासून तात्काळ जिल्हा प्रशासनाने याबाबतच्या उपाययोजना करावी असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

पत्रात डॉ. नीलम गोऱ्हे म्हणतात, ‘करचखेडा (भिलेवाडा), जि. भंडारा येथे कोरोना रुग्णांचे अर्धवट जळलेले मृतदेह कुत्र्यांनी गावात आणल्याचा भयंकर प्रकार ११ एप्रिल रोजी माध्यमांद्वारे समोर आला आहे. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. मात्र बाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही हाल होत असल्याची बाब पुढे आली आहे. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अर्धवट जळलेले मृतदेह बेवारस कुत्रे गावात आणून लचके तोडत आहेत. हे गोष्ट अतिशय संतापजनक आहे. 

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मृतदेह पूर्णपणे जळाल्यानंतरच स्मशानभूमी सोडावी आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी. या घटनेची वस्तुस्थिती तपासून जिल्हा प्रशासनाने तत्काळ याबाबतच्या उपाययोजना कराव्या.’ 

हेही वाचा : अनिल देशमुख आज देणार सीबीआयच्या प्रश्नांची उत्तरे

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पत्र काल जिल्हा प्रशासनाला मिळाले. नंतर लगेच जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. हे पत्र मिळण्यापूर्वी लोकांच्या रोषालाही जिल्हा प्रशासनाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता यानंतर असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख