नांदेडच्या भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, मात्र धक्के जाणवले नाहीत... - the epicenter of nanded earthquake was in yavatmal district but no tremors were felt | Politics Marathi News - Sarkarnama

नांदेडच्या भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, मात्र धक्के जाणवले नाहीत...

राजकुमार भीतकर
रविवार, 11 जुलै 2021

केंद्रबिंदूच्या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली. आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवले नाहीत

यवतमाळ : आज सकाळी 8:33 मिनिटांनी नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर the epicenter of nanded earthquake was in yavatmal district's sadhunagar येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.  No turmors were felt in the villages. 

भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत आणि कोणती हानीही झालेली नाही. महागावचे तहसीलदार आणि त्यांच्या चमूने गावांमध्ये भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडोना आणि साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले असून त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे, मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना  सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे महागाव तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले. 

केंद्रबिंदूच्या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली. आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जीवित व वित्त हानी झालेली नासल्याचेही श्री इसळकर यांनी सांगितले. तरीही आमची चमू दिवसभर काही घडामोडी झाल्यास परिस्थिती हाताळण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.  प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, असे उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांनी सांगितले. 

हेही वाचा : ओबीसी नेते दिशाभूल तर करीत नाहीत ना?, समाजात संभ्रमाची स्थिती...

यापूर्वी सन २०१९ मध्येही यवतमाळ व नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यावेळी भयभीत होऊन नागरिकांना घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी सहारा घेतला होता. तेव्हाही जीव हानी झाली नव्हती पण घरांचे मात्र नुकसान झाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील माहुर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर आणि तरोडा बुद्रुक या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्‍टर स्केलवर या भूकंपाची नोंद होताच प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख