ऊर्जामंत्री राऊत म्हणाले,  गडकरींनी निवडणूक चांगल्या पद्धतीने सांभाळली म्हणून...

आपल्या प्रतिक्रियेतून त्यांनी ना. गडकरींना जबरदस्त टोला हाणलाय. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, याचा बोध त्यांच्या वक्तव्यातून निश्‍चितच होत आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपच्या गोटात काही हालचाली होतात का आणि डॉ. राउतांच्या या टोल्याला प्रतिटोला हाणला जातो का ?
Nitin Gadkari - Nitin Raut.
Nitin Gadkari - Nitin Raut.

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. नितीन गडकरी आमदार राहिलेल्या या मतदारसंघात मिळालेल्या विजयाचे श्रेय राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिलेय. ‘मी नितीन गडकरी यांना धन्यवाद दिले पाहिजे’, असे म्हणत त्यांनी ना. गडकरींना चिमटा काढला. 

विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपच्या गोटातून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अनिल देशमुख यांच्यापासून ते कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. शरद पवारांनी ‘महाराष्ट्राचं चित्र बदलतंय’, अशी सूचक प्रतिक्रिया देऊन आनंद व्यक्त केला. ‘भाजपने आतातरी सुधारावे, महाराष्ट्राचा अपमान करू नये’, अशी प्रतिक्रिया दिली, तर अतुल लोंढे म्हणाले, ‘हा भाजपचा नव्हे तर देवेंद्र फडणविसांचा पराभव आहे.’

डॉ. नितीन राउतांनी प्रतिक्रिया देताना ना. गडकरींना जबरदस्त टोला हाणलाय. ते म्हणतात, ‘मी नितीन गडकरी यांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि आभार मानले पाहिजेत. त्यांनी या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये विजयाची संधी प्राप्त करून दिली. नितीन गडकरी यांनी त्या मतदार संघाचे चार ते पाच वेळा नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा तो मतदार संघ आहे. त्यामध्ये कधीही काँग्रेस किंवा इतर पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. म्हणूनच त्यांचे विशेष आभार की त्यांनी आम्हाला ही संधी प्राप्त करून दिली.’

आपल्या प्रतिक्रियेतून त्यांनी ना. गडकरींना जबरदस्त टोला हाणलाय. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, याचा बोध त्यांच्या वक्तव्यातून निश्‍चितच होत आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपच्या गोटात काही हालचाली होतात का आणि डॉ. राउतांच्या या टोल्याला प्रतिटोला हाणला जातो का, याकडे लक्ष लागून राहणार आहे. 
Edited By : Atul Mehere
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com