अमरावतीच्या शिक्षक आमदारांसह कालपासून 84 बाधित 

पाझिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये दोन वर्षांचा एक लहान मुलगा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तत्पूर्वी पीडीएमसी मध्ये त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.
Corona
Corona

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे आणि तेव्हापासून आज आत्तापर्यंत एकूण 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे. प्रशासनासह शहरवासींसाठी हा मोठा धक्का आहे. संबंधित आमदारांनी शिक्षकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी वारंवार मुंबईत मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे ते बाधित झाले असण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

आमदारांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयाच्या लॅबमध्ये टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली, असे त्यांचे स्वीय सहायक रवींद्र सोळंके यांनी सांगितले. पीडीएमसीचे डीन डॉ. पद्माकर सोमवंशी यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला. जिल्ह्याचा आकडा आता 865 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला असतानाच कोरोनाचा हा ब्लास्ट झाला. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला. एकूण 565 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

अमरावती शहरात कोरोनाच्या रुग्णांनी आठवे शतक पूर्ण केले असून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. जिल्ह्यातील एक विधान परिषदेचे सदस्यदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अमरावती शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत 100 ने वाढ झाली होती. तर कालपासून ८४ नवीन रुग्ण आढळून आल्याने अमरावतीकर नागरिक व जिल्हा प्रशासनांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कोरोनाची साखळी तोडण्याकरिता अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

पाझिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये दोन वर्षांचा एक लहान मुलगा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तत्पूर्वी पीडीएमसी मध्ये त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. या अहवालात हमालपुरा, सुभाष कॉलोनी, रोशन नगर, मांगीलाल प्लॉट व तिवसा तालुक्‍यातील सातरगाव या परिसरात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.        (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com