अनिल देशमुखांच्या निकटवर्तीयांवर ED चे छापे : नागपुरात खळबळ

तिघेही जण काय व्यवसाय करतात, याबद्दलही फारशी कुणाला काही माहिती नाही. राजकीय वर्तुळातही या तिघांना कुणी ओळखत नसल्याची माहिती आहे. पण आज झालेल्या कारवाईमुळे ही नावे अचानक चर्चेत आली आहेत.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर : शहरातील समीर आयजॅक, Sameer Ayjack सागर भाटेवारा Sagar Bhatewara आणि जाफरी बंधू Jafari Brothers यांच्या घरांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज छापे घातले. तिघांच्याही घरांवर एकाच वेळी कारवाई सुरू करण्यात आली. All three houses were raided at the same time ही कारवाई दिवसभर चालली. आयजॅक यांच्यासह भाटेवार आणि जाफरी बंधू हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जातात. Former Home Minister Anil Deshmukh is considered close त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा फास आवळला जातोय, अशी चर्चा आहे. 

आज ज्यांच्या घरी छापे पडले, ते तिघेही जण काय व्यवसाय करतात, याबद्दलही फारशी कुणाला काही माहिती नाही. राजकीय वर्तुळातही या तिघांना कुणी ओळखत नसल्याची माहिती आहे. पण आज झालेल्या कारवाईमुळे ही नावे अचानक चर्चेत आली आहेत. सागर भाटेवारा यांच्या शिवाजीनगर येथील घरी, समीर आयझॅक सदर आणि जाफरी बंधू यांच्या जाफरनगरमधील घरांवर दिवसभर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यापूर्वी सीबीआयच्या चमूने अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयात कारवाई केली होती आणि आज ईडीची कारवाई झाल्याने विविध चर्चांना पेव फुटले आहे. 

आजच्या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या कारवाईनंतर पुढे आणखी काय, ही चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात अनिल देशमुख याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मोबाइल फोन बंद होता. तसेच त्यांच्या कार्यालयातूनही प्रतिसाद मिळाला नाही. काहीच दिवसांपूर्वीच ईडीने गुन्हा नोंदवून अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आले होते. या बारमालकांची चौकशी सीबीआयने देखील केली होती. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात केला होता. आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाने सुरू केला आहे. आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आले आहेत. दरम्यान, अंधेरीतील एका बार मालकांकडून सचिन वाझे यांना अडीच लाख रुपये दिले जात होते. ते परमबीरसिंगाना याची माहिती देत होते. 

परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीनेही तपास सुरू केला होता. याच तपासाचा एक भाग म्हणून आजची कारवाई असल्याची सांगण्यात आले आहे. अंधेरीतील एका बार मालकाची ईडीने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बार मालक सचिन वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये द्यायचा. याची माहिती वाझे थेट परमबीर सिंग यांना देत होते, अशीही माहिती आहे. या प्रकरणी आता ईडीने मुंबईतील पाच बार मालकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हे बार मालक त्रास दिला जाऊन नये म्हणून वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये देत होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. 

आजच्या कारवाईबाबत अनिल देशमुख यांच्याकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया आलेली नाही आणि समीर आयजॅक, सागर भाटेवारा आणि जाफरी बंधू हे तिघेही जण त्यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com