राठोडांच्या शक्तिप्रदर्शनच्यावेळी स्वतः महंतच होते कोरोना पॉझिटिव्ह, उद्रेक वाढणार ?

शक्तिप्रदर्शनात सहभागी झालेले लोक यवतमाळ शहर, दारव्हा, दिग्रस आणि नेर या तीन तालुक्यांतून गेले होते. त्यामुळे आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याच्या मार्गावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता बळावली आहे.
Sanjay Rathod Crowed poharadevi
Sanjay Rathod Crowed poharadevi

वाशीम : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राज्यभरातील लोकांच्या रोषाला बळी ठरलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी २३ फेब्रुवारीला वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. त्याचे परिणाम यायला आता सुरुवात झाली आहे. पोहरादेवीचे मुख्य महंत कबिरदास महाराज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे आता वाशीमसह यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत कबिरदास महाराजांनी २२ फेब्रुवारीला स्वॅब नमुना दिला होता. त्याचा अहवाल काल २४ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह आला. म्हणजेच २३ फेब्रुवारीला ते कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांनीच वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी होम हवन आणि पूजापाठ केले. मंत्री राठोड, त्यांची पत्नी शीतल राठोड, साळा सचिन नाईक आणि काही कार्यकर्ते पूर्णवेळ त्यांच्यासोबत होते. त्यानंतर संजय राठोड दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे मुंगसाजी माउलीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर नेर तालुक्यातील मानकी आंबा येथेही ताफ्यासह ते दर्शनाला गेले होते. देवदर्शन आटोपल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. हा दिवस यवतमाळात घालवल्यानंतर काल २४ फेब्रुवारीला मंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ ते नागपूर प्रवास केला व येथून विमानाने ते मुंबईला मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेले. 

जर मंत्री राठोड २३ फेब्रुवारीला कोरोना पॉझिटिव्ह झाले असतील तर त्यानंतर ते जेथे जेथे गेले तेथील लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. पोहरादेवीचे मुख्य महंत कबिरदास महाराज कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांच्यासह ८ ते १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचीही माहिती आहे. राठोडांच्या शक्तिप्रदर्शनाच्या दिवशी पोहरादेवीत १० ते १५ हजार लोक होते. त्यामुळे येथून किती जण बाधित झाले. याचा शोध घेणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. शक्तिप्रदर्शनात सहभागी झालेले लोक यवतमाळ शहर, दारव्हा, दिग्रस आणि नेर या तीन तालुक्यांतून गेले होते. त्यामुळे आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याच्या मार्गावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता बळावली आहे. 

पोहरादेवीतून कोरोनाचा संसर्ग वाशीम आणि यवतमाळ जिल्हाभर वाढल्यास त्याची जबाबदारी कुणाची, याचे उत्तर द्यायला कुणीही तयार नाही. महंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आता लोकांची पंढरी घाबरली आहे. वाशीम जिल्हा पोलिसांनी २३ फेब्रुवारीच्या शक्तिप्रदर्शनानंतर १० हजार लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये १० लोकांच्या नावांची नोंद आहे उर्वरित सर्व निनावी आहेत. पण त्या दिवशी जमलेल्या गर्दीतील लोकांवर कारवाई करण्यापेक्षा ती गर्दी जमवण्यासाठी जे जबाबदार Kaआहेत, त्या मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे. पण त्या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्रीसुद्धा संजय राठोड यांनी केलेल्या कृत्यावर बोलायला तयार नाहीत. आतातरी राठोडांवर गर्दी जमवल्याप्रकरणी कारवाई होईल का, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com