नीळकंठरावांच्या प्रवेशाने पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल : ईश्‍वर बाळबुधे   - dur to entry of nilkanthrao the party and organization will be stronger | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

नीळकंठरावांच्या प्रवेशाने पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल : ईश्‍वर बाळबुधे  

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्व सर्वांना ठाऊक आहे. आता राज्यभर संघटन मजबूत करण्याचे कार्य पक्षाने हाती घेतले आहे. पिसे यांचा प्रवेश त्याच श्रृंखलेतील एक कडी असल्याचे मानले जात आहे. 

नागपूर : विदर्भातील तेली समाजाचे ज्येष्ठ नेते नीळकंठराव पिसे Senior Leader Nilkanthrao Pise यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP State president Jayant Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. नीळकंठराव तेली समाजाचे संघटन आणि ओबीसी चळवळीतील एक मोठे प्रस्थ आहेत. त्यांच्या प्रवेशाने विदर्भात पक्षाचे आणि समाजाचे संघटन अधिक मजबूत होईल, The Party and the organization will be stronger असा विश्‍वास ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे Ishwar Balbudhe यांनी व्यक्त केला. 

बाळबुधे यांच्याच पुढाकाराने त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. जयंत पाटील यांनी मुंबई येथे नीळकंठ पिसे यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये, पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, युवक अध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आणि विनय डहाके उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्व सर्वांना ठाऊक आहे. आता राज्यभर संघटन मजबूत करण्याचे कार्य पक्षाने हाती घेतले आहे. पिसे यांचा प्रवेश त्याच श्रृंखलेतील एक कडी असल्याचे मानले जात आहे. 

नीळकंठ पिसे तेली समाजाचे राज्य संघटक आहे. अगदी सुरुवातीपासून समाजाचे संघटन वाढविण्यात त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. खासदार रामदास तडस यांच्या सोबतीने त्यांनी राज्यभर समाजाचे नेटवर्क वाढविले आहे. राज्यभर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एके काळी रामदास तडस हे त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नसत. सन १९९७ मध्ये पिसे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली होती. ओबीसीच्या चळवळीतही त्यांनी मोठे कार्य करून भरीव योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आजही तेली समाजातील आणि ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देते. 

हेही वाचा : दिलासा देण्याचे सोडून शोषण केले, अन् मग फक्त अश्रू गाळले...

ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नंतरच्या काळात राष्ट्रीय ओबीसी महासंघ या नावानेच नोंदणी केली आणि त्यांचे कार्य पुढे वाढविले. आजही ओबीसींच्या लढ्यामध्ये पिसे अग्रेसर असतात. मुळचे वर्धा येथील असलेले नीळकंठराव पिसे यांच्या कार्याची व्याप्ती मोठी आहे. समाजकारणासोबत राजकारणतही त्यांनी विविध पदे भूषविली आहे. वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचे आजवरचे समाजकारण आणि राजकारणाचा लाभ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाढीसाठी होणार असल्याचा विश्‍वास ईश्‍वर बाळबुधे यांनी व्यक्त केला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख