शेणाचा हात पेनाला... मिटकरींच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण ! 

आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आज रोजी शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाले. माझ्या जीवनातील हा अत्युच्च क्षण कधीच विसरता येणार नाही. याच दिवशी शेणाचे हात पेनाला लागले. आजच राजकीय पुनर्जन्म झाला.
Sharad Pawar - Amol Mitkari
Sharad Pawar - Amol Mitkari

नागपूर : आमदार अमोल मिटकरी MLA Amil Mitkari यांनी मागील वर्षी याच दिवशी आमदारकीची शपथ घेतली होती. He was sworn in as MLA on the same day last year कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी राष्ट्रवाद कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांचे आभार मानले आहे. यासंदर्भात त्यांनी आज एक ट्विट केले. यामध्ये ‘याच दिवशी शेणाचे हात पेनाला लागले’, असे लिहीत त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहे. He has thanked Sharad Pawar

सन २०१९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट सुरू होती. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते एक-एक करून पक्षाला सोडून जात होते. त्यावेळी काही मोजकेच शिलेदार त्यांच्याकडे राहिले होते. त्या परिस्थितीत पवारांनी संपूर्ण महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली होती आणि निघाले होते महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी आणि सोडून गेलेल्या सहकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी. याचा त्यांनी जणू चंगच बांधला होता. पण आपल्या शिलेदारांना त्यांनी आपआपले जिल्हे सांभाळायला सांगितले होते आणि स्वतः एकटेच महाराष्ट्र जिंकण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांच्याशिवाय आणखी दोघे होते ज्यांनी राज्यभर रान उठविले होते. ते म्हणजे आज खासदार असलेले डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अमोल मिटकरी. 

या दोन्ही युवा नेत्यांनी संपूर्ण राज्य पादाक्रांत करून आणि जोरदार वक्तृत्वाच्या बळावर जनतेचा कौल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळवला. त्याची पवारांना मोठी मदत झाली. डॉ. अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी दोघांचेही वक्तृत्व उत्तम आपल्या विविधता असलेल्या भाषणांनी त्यांनी राज्यातील जनतेला भुरळ पाडली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा त्या काळातही उंचावण्यात मोठा वाटा उचलला. त्यांच्या या प्रोडक्टिव्ह कार्याची पावती न देणार, तर ते पवार कसले ? त्यांनी डॉ. कोल्हेंना खासदारकीची उमेदवारी दिली आणि अमोल मिटकरींना आमदार बनवले. आज आपल्या आमदारकीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमोल मिटकरी भावुक झाले. 

ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात, ‘आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आज रोजी शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाले. माझ्या जीवनातील हा अत्युच्च क्षण कधीच विसरता येणार नाही. याच दिवशी शेणाचे हात पेनाला लागले. आजच राजकीय पुनर्जन्म झाला. पक्षश्रेष्ठींचा विश्‍वास भविष्यात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रामाणिकपणे पुढे नेत राहील.’ हे ट्विट करताना अमोल मिटकरी भावुक झाले होते. यावेळी त्यांना २०१९ च्या निवडणुकीचा तो आणीबाणीचा काळ निश्‍चितच आठवला असणार. 

अमोल मिटकरी गेल्या वर्षी नागपुरात आले असताना त्यांनी त्या निवडणुकीच्या आठवणी सांगितल्या होत्या. पवारांची प्रकृती ठीक नसतानाही राज्यातील एक-एक जिल्हा पादाक्रांत करीत त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. गाडीतून व्यासपीठापर्यंत पायी चालताना त्यांच्या पायातून रक्त सांडत होते. पण त्यांना त्याचीही तमा नव्हती. होता केवळ ध्यास राज्यावर सत्ता स्थापन करण्याचा आणि आपले बुद्धीचातुर्य, अनुभव आणि राजकीय कौशल्य पणाला लावत त्यांनी ते करून दाखविले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com