नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर दुनेश्‍वर पेठे  - duneshwar pethe is finally the city president of ncp | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर दुनेश्‍वर पेठे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 जून 2021

आगामी काळात महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. जवळपास सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसते. आता शहराध्यक्ष म्हणून दुनेश्‍वर पेठे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.

नागपूर : नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी Nagpur City NCP President अखेर दुनेश्‍वर पेठे Duneshwar Pethe यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबई येथे त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. माजी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी जेव्हा पदाचा राजीनामा दिला, When former city president Anil Ahirkar resigned तेव्हापासून पेठे आणि प्रशांत पवार Prashant Pawar या दोन नावांवर चर्चा सुरू झाली होती. दरम्यान प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील Pravin Kunte Patil यांचेही नाव चर्चेत आले होते. पण अखेरीस महानगरपालिकेत पक्षनेते असलेले दुनेश्‍वर पेठे यांनी बाजी मारली. 

आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पेठे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी दुनेश्र्वर सूर्यभान पेठे यांचे सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील, नागपूर ग्रामीण अध्यक्ष शिवराज गुजर, अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष जावेद हबीब उपस्थित होते. प्रशांत पवार हेसुद्धा आक्रमक आहेत आणि जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पण ते बाहेरचे असल्यानेच त्यांची नियुक्ती झाली नाही, असे सांगण्यात येत आहे. 

काटोलचे आमदार अनिल देशमुख गृहमंत्री असताना ते स्वतः आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी महानगरपलिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शहरात चाचपणी सुरू केली होती. पक्षातील ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या होत्या. त्यावेळी ‘आता आम्ही मोठे भाऊ आहोत’, असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्यानंतर लागलीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा काढला. नागपूर शहर आणि जिल्ह्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि पक्षात ‘जान’ फुंकली. तेव्हाच अनिल अहिरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शहराध्यक्षपदी पक्षाच्या जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्याची निवड होईल, असे बोलले जात होते आणि झालेही तसेच. 

महानगरपालिका निवडणुकीचे मोठे आव्हान
आगामी काळात महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. जवळपास सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसते. आता शहराध्यक्ष म्हणून दुनेश्‍वर पेठे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. स्वतःच्या हिवरीनगर, वर्धमाननगर परिसरात त्यांचा चांगला प्रभाव आहे. पण आता स्वतःच्या प्रभागासह त्यांना संपूर्ण शहरासाठी काम करावे लागणार आहे. जुने, नवीन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन त्यांना ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. पेठे मनमिळाऊ आहेत, त्यामुळे हे आव्हान ते लीलया पेलतील, असे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. एकंदरीतच काय तर त्यांच्या नियुक्तीचे पक्षात स्वागत होत आहे. 

हेही वाचा : चंद्रपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नेमणार : नाना पटोले

प्रशांत पवार कुठे ?
जिल्हाध्यक्षाच्या निवडीची तयारी सुरू असताना परवा परवा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. ते सद्यस्थितीत प्रदेशच्या समितीवर आहेत. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांना जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त होण्याची अपेक्षा होती. पण त्यांना संधी मिळाली नाही. पक्ष त्यांच्या विचार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी काळात त्यांनाही सामावून घेतले जाईल, असे सांगण्यात येत आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख