डॉ. राजेंद्र शिंगणे चंद्रपूर जिल्ह्याला तातडीने देणार रेमेडेसिव्हिर... - dr rajendra shingne will give remedivisvir to chandrapur district immediately | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. राजेंद्र शिंगणे चंद्रपूर जिल्ह्याला तातडीने देणार रेमेडेसिव्हिर...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

चंद्रपूर जिल्‍हयात रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. मृत्‍युदर वाढत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यासाठी इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाहीत ही चिंतेची बाब आहे.

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यासाठी तातडीने  रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना दिला होता. दरम्यान या विषयासंदर्भात आमदार मुनगंटीवार यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने चंद्रपुर जिल्ह्यासाठी इंजेक्शन्स उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे.

चंद्रपूर जिल्‍हयात रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. मृत्‍युदर वाढत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यासाठी इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाहीत ही चिंतेची बाब आहे. आपण नाशिकला ७ हजार इंजेक्‍शन उपलब्‍ध केले. मुंबई व नागपूर साठीसुध्‍दा इंजेक्‍शन उपलब्‍ध केले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भातच असा सापत्‍न भाव का, असा प्रश्‍न मनात निर्माण झाला आहे. नागपूरच्‍या डेपोमध्‍ये काल इंजेक्‍शन उपलब्‍ध झाल्‍याचे समजते. आपण त्वरित इंजेक्‍शन उद्या सकाळपर्यंत चंद्रपूर जिल्‍हयासाठी उपलब्‍ध करावे, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली होती. त्यावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तसे आश्‍वासन दिले आहे. 

१ हजार लीटर सॅनिटायझर उपलब्‍ध...
गेल्‍या वर्षी कोरोनाच्‍या प्रादुर्भाव काळात माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने उपलब्‍ध करण्‍यात आलेल्‍या ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनसाठी आजपासून १ हजार लीटर सॅनिटायझर उपलब्‍ध करण्‍यात येत आहे. कोरोनाची वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हे पाऊल महत्‍वपूर्ण ठरणार आहे.

गेल्‍या वर्षी मार्च महिन्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी स्‍थानिक गुन्‍हे शाखा चंद्रपूर, सायबर सेल चंद्रपूर, शहर पोलिस स्‍टेशन चंद्रपूर, रामनगर पोलिस स्‍टेशन चंद्रपूर,वाहतूक शाखा नियंत्रण शाखा चंद्रपूर, दुर्गापूर पोलिस स्‍टेशन, बल्‍लारपूर पोलिस स्‍टेशन, पोलिस स्‍टेशन पोंभुर्णा, चंद्रपूर तहसिल कार्यालय, तहसिल कार्यालय मुल, तहसिल कार्यालय गोंडपिपरी, तहसिल कार्यालय गडचांदुर,  प्रा.आ. केंद्र घुग्‍गुस, ग्राम पंचायत घुग्‍गुस, प्रा.आ.केंद्र बाळापूर, कोविड सेंटर महिला व पुरूष मुल, कोरोना केअर सेंटर नागभिड,  ग्रा.रूग्‍णालय बल्‍लारपूर, ग्रा. रूग्‍णालय पोंभुर्णा, ग्रामिण रूग्‍णालय मुल, ग्रा. रूग्‍णालय राजुरा, ग्रा. रूग्‍णालय गडचांदुर, प्रा.आ.केंद्र. मारोडा, प्रा.आ.केंद्र, राजोली, प्रा.आ.केंद्र कोठारी, प्रा.आ.केंद्र चिरोली, प्रा.आ.केंद्र बेंबाळ, प्रा.आ. केंद्र नवेगाव मोरे, प्रा.आ.केंद्र चिचपल्‍ली, प्रा.आ.केंद्र दुर्गापूर, प्रा.आ. केंद्र विसापूर, प्रा.आ.केंद्र कळमना, बॅंक ऑफ राजुरा, प्रा.आ. केंद्र साखरवाही, विदर्भ कोकण ग्रामिण बॅंक शाखा घोडपेठ, विदर्भ कोकण ग्रामिण बॅंक शाखा बंगाली कॅम्‍प, जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंक पिपरी धानोरा, चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंक विसापूर, विदर्भ कोकण बॅंक चंद्रपूर, युको बॅंक चंद्रपूर,  एलआयसी ऑफीस मुख्‍य शाखा, चंद्रपूर, राजीव गांधी महाविदयालय बंगाली कॅम्‍प चंद्रपूर, सरदार पटेल महाविदयालय चंद्रपूर, एफ ई एस गर्ल्‍स महाविदयाल, चंद्रपूर, लिंगायत बहु. सामाजिक संस्‍था चंद्रपूर, पंचायत समिती गोंडपिपरी, मारोडा ग्रामपंचायत, प्रधान डाकघर चंद्रपूर, बांबु प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, नगर पंचायत पोभुर्णा, पोलिस मुख्‍या‍लय चंद्रपूर, व्‍यंकटेश गॅस एजंसी बल्‍लारपूर, साईमंदिर चंद्रपूर, गजानन महाराज मंदिर चंद्रपूर, कन्‍यका माता मंदिर चंद्रपूर, महाकाली मंदिर चंद्रपूर, आश्रय चंद्रपूर, पत्रकार भवन चंद्रपूर, नालंदा क्रिडा मंडळ, चंद्रपूर इत्‍यादी ६० ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. आता पून्‍हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन रूग्‍णसंख्‍या वाढत असल्‍यामुळे त्यांनी १ हजार लीटर सॅनिटायझर उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा : कडक लॉकडाऊन : चेन कायमच, यंत्रणा ब्रेक...

प्रत्‍येक ऑटो‍मॅटीक सॅनिटायझर मशीनसाठी ५ लीटर सॅनिटायझर उपलब्‍ध करण्‍यात येणार असून यासाठी भाजपाचे महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे व महानगर महामंत्री ब्रिजभुषण पाझारे  यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख