वीज विभागाच्या सर्व कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना फ्रंट लाइन वॉरिअर्स घोषित करा…

वीज पुरवठा दुरुस्तीचे काम करतो. सततच्या त्यांच्या या सेवेमुळे अनेक वीज कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांची सेवा लक्षात घेता त्यांना फ्रंटलाइन वॉरिअरचा दर्जा द्यावा.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

नागपूर : राज्यातील ऊर्जा विभागात हजारो कर्मचारी सेवा देत आहेत. वीज ग्राहक, कारखाने, रुग्णालये, रेल्वे Customer, Industries, hospitals, Railways या महत्त्वपूर्ण सेवा विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. वीज पुरवठा हा जीवनावश्‍यक सेवेत मोडतो. त्यामुळे वीज विभागाच्या सर्व कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना फ्रंट लाइन वॉरिअर्स घोषित करा आणि प्राधान्याने त्यांचे लसीकरण करा, Declare front line warriors and vaccinate them preferablyअशी मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी केली. 

सध्या कोरोना महामारीच्या काळात अने  कोरोनाग्रस्त रुग्णालयांमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचे महत्वपूर्ण काम वीज कर्मचारी करीत आहेत. प्रत्येक संकटात धावून जाणारा हा कर्मचारी आपल्या जिवावर उदार होऊन खंडित वीज पुरवठा दुरुस्तीचे काम करतो. सततच्या त्यांच्या या सेवेमुळे अनेक वीज कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांची सेवा लक्षात घेता त्यांना फ्रंटलाइन वॉरिअरचा दर्जा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात बावनकुळे यांनी म्हटले आहे. जे वीज कर्मचारी कोरोना संक्रमण काळात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याची मागणीही त्यांनी केली.

पूर्व विदर्भातील धान शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानाची खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने तत्परता दाखवावी. या खरेदीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, ह क्रांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लक्षात घेतले पाहिजे. असा सल्ला बावनकुळेंनी दिला. भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धान कापून तयार आहे. सरकारकडून धान खरेदी करण्याबाबत घोषणा करण्यात आल्या. परंतु अद्याप जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एक क्विंटलही धान खरेदी करण्यात आला नाही. त्यामुळे सर्व धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, खरीप हंगामाचे बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. १ मे ते ३० जूनपर्यंत ऑनलाइन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे बंधनकारक नाही, ही अट शिथिल करण्यात यावी, खरीप हंगामातील ३१ मार्चपर्यंत सात बारा ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांचा धान खरेदी करावा, गोदाम कमी पडल्यास तुमसर बाजार समितीत धान खरेदी करावी आदी मागण्या यापूर्वीच करण्यात आल्या होत्या. 

प्रशासनाकडून कुठलाही तोडगा न काढला गेल्याने अखेर आज तेथील लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. ३० एप्रिल रोजी दोन्ही तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. मागण्यांबाबत तीन दिवसांत दिलासा मिळायला पाहिजे होता, पण मिळाला नाही. आज जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्रत्यक्ष दोन तास चर्चेला बसले. दोन तासांच्या चर्चेत हे लक्षात आले की एकही क्विंटल धान खरेदी अद्याप करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना अजूनही मागच्या खरिपाचा बोनस मिळालेला नाही. अंदाजे दोन आठवड्यात पावसाला सुरुवात होऊ शकते. तोपर्यंत धानाची खरेदी न झाल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता सरकारने धान खरेदीत तत्परता दाखवावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. 
Edited By : Atul Mehere 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com