दादा कोंडके ते सलमान खानची गाणी गाजविणारे संगीतकार लक्ष्मण कालवश

लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची सुरुवात नागपुरातील गाजलेल्या कादर ऑर्केस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे ऑर्केस्ट्रात गायचे.
Lakshman Musicion
Lakshman Musicion

नागपूर : सिनेसृष्टीत गाजलेली संगीतकार जोडी राम-लक्ष्मण. Musician duo Ram-Laxmanया जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील Vijay Patil यांचे आज नागपुरात मुलाकडे निधन झाले.  नागपूरच्या गाजलेल्या कादर ऑर्केस्ट्रामधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. He started his career with Kadar Orchestraकादर हे त्यांचे  चांगले मित्र आहेत. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या नंतर पत्नी शोभा पाटील, Shobha Patil मुलगा संगीतकार अमर पाटील, Amar Patil सुना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

राम कदम उपाख्य राम व विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. राम-लक्ष्मण याच नावाने या जोडीने अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले. दादा कोंडकेंपासून ते सलमान खानचे हिट चित्रपट या जोडीने दिले आहेत. राजश्री फिल्म्सच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. १९७६ साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण हेच नाव कायम ठेवले आणि अखेरपर्यंत याच नावाने संगीत देत राहिले. सुरुवातीला मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यंत त्यांनी सुमारे ७५ हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे.  

हिंदी चित्रपटांमध्ये ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. इथपर्यत उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली. १९८९ च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान माधुरी आणि भाग्यश्री पटवर्धन अभिनित चित्रपटाने त्यांना या इंडस्ट्रीत अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची सुरुवात नागपुरातील गाजलेल्या कादर ऑर्केस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे ऑर्केस्ट्रात गायचे. लक्ष्मण काही वर्षांनी मुंबईला निघून गेले. आज त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ, जिवलग मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यंत जपत. त्यांनीच मला अंतिम न्याय व फौज या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली असल्याचे कादर यांनी सांगितले. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी आज सांगितली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com