रेड्डीने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा न्यायालयाचा ठपका, तरीही कारवाई का नाही? - court reprimands reddy for intentional negligence why no action | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

रेड्डीने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा न्यायालयाचा ठपका, तरीही कारवाई का नाही?

अरुण जोशी
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

दीपाली आत्महत्या प्रकरणात रेड्डी सरकारी दस्तऐवज फेरफार करू शकतात किंवा पुरावे प्रभावित करू शकतात. तपासात खोडा घालण्यास देखील रेड्डी कारणीभूत ठरू शकतात. दीपाली यांनी विनोद शिवकुमारच्या केलेल्या तक्रारींकडे रेड्डी यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा ठपका न्या. एस. के. मुनगीलवार यांनी ठेवला आहे.

अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताना न्या. एस. के. मुनगीलवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. दीपाली प्रकरणाचा तपास करणाऱ्या अमरावती पोलिसांकडे अजूनही निकालाची प्रत पोहोचलेली नाही का? की रेड्डीला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असे प्रश्‍न भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केले आहेत.
 
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी एम. एस. रेड्डी यांनी अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली होती. रेड्डींचा अटकपूर्व जामीन नाकारताना न्या. एस. के. मुनगीलवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत. दीपाली प्रकरणातील आरोपी विनोद शिवकुमार याच्या सर्व तक्रारी रेड्डी यांच्या कानावर होत्या. मात्र, रेड्डी यांनी विनोद शिवकुमारवर कुठलीच कारवाई केली नाही व त्याच्या वर्तणुकीला आळा देखील घातला नाही. 

दीपाली आत्महत्या प्रकरणात रेड्डी सरकारी दस्तऐवज फेरफार करू शकतात किंवा पुरावे प्रभावित करू शकतात. तपासात खोडा घालण्यास देखील रेड्डी कारणीभूत ठरू शकतात. दीपाली यांनी विनोद शिवकुमारच्या केलेल्या तक्रारींकडे रेड्डी यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा ठपका न्या. एस. के. मुनगीलवार यांनी ठेवला आहे. न्यायालयीन सुनावणीत ताशेरे मारले असतानाही पोलिसांचा व सरकारी उच्चपदस्थांचा रेड्डीला वाचवण्याचा अट्टहास का, असा प्रश्नदेखील शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी : 11 एप्रिलला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली  

आईची पण तक्रार
दीपाली चव्हाण यांच्या आई शकुंतला चव्हाण यांनीदेखील रेड्डी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सर्व प्रकारचे पुरावे उपलब्ध असताना सरकार रेड्डीला का वाचवते आहे, हा प्रश्न संपूर्ण समाजाला पडला असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख