मतमोजणीला मोबाईल, टॅब नेण्यास मनाई, २८ टेबलवर होणार मोजणी..

बॅलेट पेटीमधील बॅलेट उघडे करू नये, तसेच फोल्ड करून मतमोजणी करावी. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेबाबत माहिती क्षेत्रनिहाय द्यावी. विस्तृत मतमोजणीमध्ये १ हजार बॅलेट पेपर राहणार आहेत. त्यातील संशयात्मक मतपत्रिका वेगळ्या करण्यात येणार आहेत.
Ballet Paper Counting
Ballet Paper Counting

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल किंवा टॅब नेण्यास मनाई राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मतमोजणीचे तिसरे प्रशिक्षण कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडले. यावेळी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती निशिकांत सुके यांनी सादरीकरणातून दिली. मतमोजणीच्या वेळी २८ टेबल राहणार आहेत. 

प्राथमिक मतमोजणीत पोस्टल बॅलेट पेटीतील सर्व बॅलेट रिकामे करून डिक्लेरेशन व पोस्टल बॅलेट वेगवेगळे करावे. डिक्लेरेशन नसल्यास, फाटले असल्यास, संशयित असल्यास ते वेगळ्या पेटीत ठेवावे. नंतर त्यांची योग्य तपासणी करून साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. निवडणूक निरीक्षक एस.आर व्ही. श्रीनिवासन यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट दिली. २ डिसेंबरला निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

एकूण २० मतपत्रिका पेट्या 
बॅलेट पेटीमधील बॅलेट उघडे करू नये, तसेच फोल्ड करून मतमोजणी करावी. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेबाबत माहिती क्षेत्रनिहाय द्यावी. विस्तृत मतमोजणीमध्ये १ हजार बॅलेट पेपर राहणार आहेत. त्यातील संशयात्मक मतपत्रिका वेगळ्या करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत एकूण १९ उमेदवार असल्याने १९ पेट्या असणार आहेत व संशयात्मक मतपत्रिकेसाठी एक पेटी अशा २० पेट्या राहणार आहेत. प्रथम पसंतीच्या मतास मतमोजणीत प्राधान्य देण्यात येऊन नंतर इतर पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार आहे. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणाऱ्या मतदारास कोणत्याही पेनने पसंती दर्शविली तरी मत वैध ठरविण्यात येणार आहे.
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com