महानगरपालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, ज्येष्ठ नगरसेवकाचा भाजपला घरचा अहेर..

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. एनयुएचएम, एनयुएलएम, प्रधानमंत्री आवास योजना, समग्र शिक्षा अभियान यांसह १० योजनांमध्ये प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून घोळ घातला आहे.
Dharmpal Meshram
Dharmpal Meshram

नागपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या ज्या योजना Schems of state and central government नागपूर महानगरपालिकेच्या Nagpur municipal corporation सीमेअंतर्गत राबविल्या जातात, त्या राबवणारी संस्था महानगरपालिका आहे. महानगरपालिका ही नोडल एजन्सी आहे. केंद्र सरकारच्या १० योजना आणि राज्य सरकारची प्रमुख असलेली योजना समग्र शिक्षा अभियान ही योजना राबविताना महानगरपालिका प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेता आपल्याच स्तरावर या योजना राबविल्या आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि ज्येष्ठ नगरसेवक धर्मपाल मेश्राम Dharmpal Meshram यांनी केला आहे. 

त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. एनयुएचएम, एनयुएलएम, प्रधानमंत्री आवास योजना, समग्र शिक्षा अभियान यांसह १० योजनांमध्ये प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून घोळ घातला आहे. प्रशासकीय अधिकारी अशा अनेक क्लुप्त्या लढवतात की ज्यामुळे भ्रष्टाचार ते सहज घडवून आणतात. हा भ्रष्टाचार सफाईदारपणे ते पदाधिकाऱ्यांच्या नजरेस येऊ देत नाहीत. तर मग जनतेला माहिती होण्याचा प्रश्‍नच नाही आणि जरी कुणाच्या लक्षात हा बोगस कारभार आला, तरी प्रशासन कुणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करू देत नाही, असे धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. 

जेव्हा हा प्रश्‍न मी सभागृहात उचलला, तेव्हा महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाच सदस्यीय समिती बसवलेली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर सर्व बाबी महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि जनतेच्या समक्ष येतील. राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही योजना राबविताना प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये घोळ घालत असते. साहेबराव राऊत शिक्षणाधिकारी होते. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता आणि हे सिद्धही झाले होते. नंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. केंद्र आणि राज्य शासनाने प्रौढ शिक्षणासाठी दिलेल्या निधीत त्यांनी भ्रष्टाचार केला होता, हेसुद्धा मेश्राम यांनी सांगितले. 

आपले ठेकेदार, एनजीओंना देतात कामे..
प्रशासनातले अधिकारी आपल्या मर्जीतील ठेकेदार आणि एनजीओंना कामे देतात. हे ठेकेदार मग प्रशासनातील अधिकाऱ्यांना लाभ पोहोचवतात. यातून पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते. पण आता पदाधिकारी जागरूक झाले आहेत आणि व्यवस्था म्हणून आम्ही या सर्व प्रकारांवर लक्ष ठेवून आहोत. 

कोणताही घोटाळा बाहेर काढताना लोकांनी जागरूक होणे, त्या प्रक्रियेमध्ये सहभाग होणे गरजेचे असते. घोटाळा जनतेसमोर जरी आला तरी त्यावर आपोआप एक प्रकारे नियंत्रण येते. त्यामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्थापित केलेल्या पाच सदस्यीय समितीच्या माध्यमातून प्रशासनाने केलेला घोटाळा निश्‍चित समोर येईल आणि दोषींना कठोर शासनही होईल, असा विश्‍वास धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com