नागपूर कारागृहात कोरोनाचा मुक्काम, 33 जण बाधित 

लॉकडाऊन जसजसे सैल होत आहे, तसतसा विषाणूचा विळखा वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला सतरंजीपुरा, मोमिनपुरा नंतर नाईक तलावाजवळील बांगलादेश वस्तीत विषाणूचा हैदोस पसरला आहे. शहरात गुरुवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये 12 कारागृहातील तर 8 नाईक तलाव बांगलादेश येथील आहेत.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील एका व्यक्तीला मंगळवारी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ब्लास्ट झाला आणि 44 जण बाधित आढळले. काल 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. कारागृहात आता एकुण 66 जण बाधित आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. कारागृह आतापर्यंत या विळख्यातून सुटले होते. मात्र आता विषाणूने कारागृहालाही आपल्या कवेत घेतले आहे. याशिवाय काल 33 जणांना बाधा झाल्याचे पुढे आले. आतापर्यंत हा आकडा 1611 वर पोचला आहे. 

लॉकडाऊन जसजसे सैल होत आहे, तसतसा विषाणूचा विळखा वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला सतरंजीपुरा, मोमिनपुरा नंतर नाईक तलावाजवळील बांगलादेश वस्तीत विषाणूचा हैदोस पसरला आहे. शहरात गुरुवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये 12 कारागृहातील तर 8 नाईक तलाव बांगलादेश येथील आहेत. याशिवाय मोठा इंदोरा, अंबिकानगर, अजनी चौक, हांडे लेआउट, भीलगाव येथील ऋषिकेश टाऊन, आठ मैल हिलटॉप येथे कोरोनाबाधित आढळले. तर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा मुक्काम सुरू झाला आहे. सकाळी कोरोनाचा नव्याने विळखा पडलेल्यांमध्ये सुरुवातीला 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल पुढे आला. 

व्हिएनआयटी विलगीकरण केंद्रातून पाठविलेले 6 नमुने माफ्सूच्या प्रयोगशाळेतून बाधित आढळले. तर 4 नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत बाधित आले. मेडिकलमधून 5 तर लता मंगेशकर रुग्णालयातून एक आणि 3 नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आले. मेयोतील आणखी 4 बाधित नमुन्यांमध्ये 2 काटोल येथील आहेत. तर तमिळनाडूचा रहिवासी तर दुसरा रविनगरातील बांधकाम विभागाच्या निवासी संकुलातील व्यक्ती असल्याचे अहवालातून आल्याची माहिती मिळाली. दुपारच्या सत्रात यात आणखी 14 जणांची वाढ झाली. खासगी आणि मेयोच्या प्रयोगशाळेतून प्रत्येकी एका नमुन्याचा अहवाल बाधित आढळला. तर नीरी प्रयोगशाळेतून 12 जण कोरोनाबाधित आढळले. ते सर्व मध्यवर्ती कारागृहातील असल्याचे सांगण्यात आले. शहरात आज नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये 12 कारागृहातील तर 8 नाईक तलाव बांगलादेश तसेच मोठा इंदोरा, येथील कोरोनाबाधित आढळून आले. 

गोंदियात 14 जण कोरोनाबाधित 
गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वेगाने वाढतो आहे. आज तब्बल चौदा जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचा अहवाल गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. एका बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. अमरावतीमध्ये 25 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यवतमाळमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आणखी पाच रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचे संख्या आता 72वर पोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com