कोरोना मुक्त झालेल्या कर्मचारी, शिक्षकांना पुन्हा लावले कामाला... 

कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या घरातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. यात काही दगावाल्याचेही सांगण्यात येते. कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्यांना कोरोना नियंत्रणाच्या कामात लावण्यात येत आहे. आजारातून नुकतेच बरे झाल्याने त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे.
Corona NGP Ziro Mile
Corona NGP Ziro Mile

नागपूर : कोरोना नियंत्रणाची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. ही सेवा बजावत असताना अनेकांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांचे मृत्यूही झाले. Many have been infected with the corona and many have died कोरोना मुक्त झालेले शिक्षक व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोना नियंत्रण कार्यक्रमाच्या सेवेत लावण्यात येत आहे. Again the corona is being put into service of the control program यामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळत असल्याची That the administration is playing with the lives of employees संतप्त भावना कर्मचाऱ्यांमध्ये बळावत चालली आहे.

सरकारने कोरोनाची चाचणी आणि लसीकरणासाठी आतापर्यंत भरपूर प्रयत्न केले. त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना कामाला लावले. कर्मचारी व शिक्षकांनी इमानेइतबारे सेवा केली. पण हे करताना अनेक कर्मचारी आणि शिक्षक कोरोनाबाधित झाले. त्यांच्यासोबत किंवा त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीयसुद्धा बाधित झाले. पोस्टकोविड आजारांमुळे अनेक जण सद्यःस्थितीत ग्रस्त आहेत. तरीही अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोना रुग्णांचा सर्वे आणि लसीकरण केंद्रांवर कामाला लावण्यात येत आहे. पण एकदा कोरोनाबाधित झालेले कर्मचारी आणि शिक्षक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यातून मुक्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाच्या कुठल्याही कामावर सेवेत लावू नये, अशी मागणी जोर धरत आहे. 

अशांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आणि जर का त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाले, तर त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. पण वातानुकूलित कक्षात बसून (स्वतःला सुरक्षित करवून घेऊन) काम करण्याचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही याचे उत्तर आजच्या तारखेत तरी नाही. त्यामुळे एकदा कोरोनाचा सामना केलेल्या कर्मचारी, शिक्षकांना पुन्हा त्याच कामात लावू नये, अशी मागणी होत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा या कर्मचारी आणि शिक्षकांनी जर आंदोलनाचे हत्यार उपसले तर सरकारसमोर पुन्हा एक नवीन संकट उभे ठाकल्याशिवाय राहणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. 

कोरोनाचा विषाणू जीवघेणा ठरत आहे. याच्या संसर्गामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातही हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखोंना त्याची लागण झाली. कोरोना नियंत्रणाच्या कामात शासकीय कर्मचाऱ्यांना लावण्यात आले. शिक्षकांना त्यांचे कर्तव्य बजावत कोरोना कामातही लावण्यात आले. घरोघरी जाऊन रुग्णाची माहिती गोळा करण्यासोबत जनजागृतीची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. ही सेवा बजावत असताना अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. ५० वर शिक्षकांना याची लागण होऊन २३ च्या जवळपास शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या घरातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. यात काही दगावाल्याचेही सांगण्यात येते. कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्यांना कोरोना नियंत्रणाच्या कामात लावण्यात येत आहे. आजारातून नुकतेच बरे झाल्याने त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे. कोरोनाचा संसर्ग कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना लवकर होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पुन्हा सेवेत लावण्यात कर्मचाऱ्यांना याचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. असे असताना कोरोना कामात लावण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कोरोना रुग्णांना विश्रांतीची गरज असते. त्यामुळे त्यांना या कामात न लावता इतर कामात लावले पाहिजे.
लिलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com