राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक सुरू, ३६ संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग..

बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा येण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाच्या वतीने संघटन सचिव बी.एल. संतोष लेखाजोखा मांडणार आहेत.
RSS
RSS

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS दोन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठकीला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. रेशीमबाग Reshimbag येथील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सकाळी 9 वाजता संघ परिवारातील संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. या बैठकीत संघ परिवारातील देशभरात असलेल्या 36 संघटना सहभागी होणार आहेत. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, Dr Mohan Bhagwat सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, Dattatray Hosbale माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी Bhaiyaji Joshi आणि इतर पदाधिकारी सहभागी आहेत. 

भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती आणि संघ परिवारातील 36 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा येण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाच्या वतीने संघटन सचिव बी.एल. संतोष लेखाजोखा मांडणार आहेत. वर्षभरात संघटनेनं काय काम केलं याचा लेखाजोखा हे प्रतिनिधी बैठकीत मांडतील. भविष्यातील रणनीतीसुद्धा या बैठकीत ठरवली जाणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये होऊ घातलेली निवडणूक, पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव, इंधन दरात सातत्याने होत असलेली वाढ, खाजगीकरण, गुंतवणूक या आणि देशातील इतर विषयांवर चर्चा आणि मंथन या बैठकीत होईल.

या समन्वय बैठकीत या विषयांवर होणार चर्चा आणि मंथन 
1) उत्तर प्रदेश आणि पंजाब मधील होऊ घातलेली निवडणूक
2) पश्चिम बंगाल मधील पराभव
3) मुंबई महापालिका निवडणूक
4) पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह काँग्रेसवर नाराज असल्यानं ते वेगळा पक्ष काढतील का? किंवा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे, यावर चर्चा
5) इंधनाचे वाढलेले दर (पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस)
6) वाढती महागाई (खाद्यतेल, डाळी इत्यादी...)
7) वाढत्या महागाई वर भाजप कार्यकर्त्यांची नाराजी
8) केंद्र सरकारने वर्षभरात घेतलेले निर्णय
9) संघ परिवाराकडून भाजपच्या अपेक्षा
10) महागाई आणि खासगीकरणाच्या विरोधात विरोधकांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी संघ परिवारातील संघटनांची आक्रमक भूमिका
11) भाजप-सेनेतील ताणलेला संबंध
12) भारताची तालिबान संदर्भातील भूमिका
13) सहकार क्षेत्रातील काँग्रेस आणि डाव्यांची मक्तेदारी मोडून काढणे
14) राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या माध्यमातून मुस्लिमांना संघाकडे वळविण्याचा प्रयत्न
15) किसान आंदोलन आणि शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणांवर चर्चा
16) शिक्षण क्षेत्रात परिवर्तन आणण्यासंदर्भात चर्चा
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com