पदोन्नती आरक्षण प्रश्नात काँग्रेसने जातीयवादी भूमिका घेणे बंद करावे, मराठा मोर्चा आक्रमक...

हजारो मराठा मुले प्रवेशापासून वंचित राहिली. महावितरण अंतर्गत नियुक्त्या मिळालेल्या मराठा उमेदवारांना राऊत यांनी आजही ताटकळत ठेवले आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष असेल तर मराठा समाज या निवडणुकीत या पक्षाला योग्य ती जागा दाखवेल.
maratha arakshan
maratha arakshan

मुंबई : पदोन्नती आरक्षण प्रश्नात काँग्रेसने जातीयवादी भूमिका घेणे बंद करावे, Congress should stop playing racist role in promotion reservation issue अन्यथा मराठा समाज Maratha society येत्या निवडणुकीत या पक्षाला योग्य ती जागा नक्की दाखवेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने Maratha Kranti Morcha दिला आहे. 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे. त्याचा निषेध करताना मराठा क्रांती मोर्चातर्फे हा इशारा देण्यात आला आहे. आता येत्या काळात काँग्रेस पक्षाला फक्त मागासवर्गीय समाजाने मतदान करावे व मराठा समाजाने मतदान करू नये, असे काँग्रेस पक्षाने जाहीर करावे, अशी उपरोधिक मागणीही मोर्चाने केली आहे. 

यावर्षी ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण शासनाने रद्द केल्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे वारंवार जातीयवादी भूमिका घेत आहेत. तर आता पटोले यांनीही पदोन्नती आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. मात्र पदोन्नती आरक्षणामुळे अशा आरक्षणाचा लाभ नसलेल्या इतर मागास जातींवरदेखील वर्षानुवर्षे अन्याय झाला आहे. काँग्रेस पक्ष अशी मागणी करून आजही अशा अन्यायाचे समर्थन करीत आहे, हे पक्षाने लक्षात घ्यावे, असेही मोर्चाने म्हटले आहे.    

यापूर्वीदेखील काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजासाठी काम करणारी सारथी ही संस्था भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम केली. मात्र अजूनपर्यंत सरकारला भ्रष्टाचाराचा एकही पुरावा सापडला नाही. त्यानंतरही गायकवाड आयोगाच्या अहवालाला बोगस संबोधण्याचे काम वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेसच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण स्थगितीचा आदेश अपलोड होण्यापूर्वीच वाहिन्यांवरील बातमी बघून ११ वी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली. 

त्यामुळे हजारो मराठा मुले प्रवेशापासून वंचित राहिली. महावितरण अंतर्गत नियुक्त्या मिळालेल्या मराठा उमेदवारांना राऊत यांनी आजही ताटकळत ठेवले आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष असेल तर मराठा समाज या निवडणुकीत या पक्षाला योग्य ती जागा दाखवेल. यापुढे राज्यात जाती जातींमध्ये वाद झाल्यास त्याची जबाबदारी काँग्रेसची राहील, असा इशाराही मराठा मोर्चाने पत्रकाद्वारे दिला आहे.
Edited By : Atul Mehere
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com