तामीळनाडू आणि पॉंडेचेरीमध्ये कॉंग्रेस-द्रमुकचे सरकार बनणार... - congress dmk government to be formed in tamilnadu and pondicherry | Politics Marathi News - Sarkarnama

तामीळनाडू आणि पॉंडेचेरीमध्ये कॉंग्रेस-द्रमुकचे सरकार बनणार...

विहंग ठाकूर
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

महाराष्ट्र हे राज्य भारत देशातच येते. याचा विसर बहुधा केंद्र सरकारला पडला असावा. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीतही केंद्र सरकारने राजकारण केले. महाराष्ट्राकडे जेवढे लक्ष द्यायला हवे होते, ते सरकारने दिले नाही. लसींचा पुरवठा योग्य प्रकारे केला नाही. परिणामी महाराष्ट्रातील लसीकरण केंद्र पडत चालली आहेत.

नवी दिल्ली : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ऊर्जा खाते आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार, याबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या. यासंदर्भात डॉ. राऊत यांच्याशी चर्चा केली असता, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचा सदस्य म्हणून मी आज दिल्लीला आलो आहे. यामागे काही वेगळे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तामीळनाडू आणि पॉंडेचरीमध्ये २ मे नंतर कॉंग्रेस-द्रमुकचे सरकार अस्तित्वात येणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जेमतेम दीड वर्ष झाले. त्यातही एक वर्ष कोरोनाच्या महामारीतच गेले. त्यातही सरकार पडणार, खातेबदल होणार, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. विरोधकांचे ते कामच आहे, ते त्यांना करू दिले पाहिजे, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यांच्या व्यतिरिक्त या फालतू चर्चा कुणी करू नये. कारण महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही आणि कुणाचाही धोका नाही. विरोधक सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, अशा आरोळ्या ठोकून ठोकून आता दमले आहेत. पूर्वी तर ते तारखा द्यायचे. आता त्यांनी ते बंद केले आहे. याचा अर्थ उर्वरित साडेतीन वर्ष विरोधातच राहायचे आहे, अशी मानसिकता त्यांनी तयार केल्याचे दिसतेय. 

राज्याच्या सरकारमध्ये सध्यातरी खातेबदल होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण सरकारकडे खूप काम आहे. कोरोनाची लढाई मोठी आहे. कोरोनाशी लढा देतानाच राज्याला विकासाच्या वाटेवरही न्यायचे आहे. गेल्या काळात विधानसभा अध्यक्षपदाबाबतही विविध चर्चांना उधाण आले होते. या विषयात कुणाच्याही व्यक्तिगत मताला काडीचीही किंमत नाही. हा निर्णय आमच्या पक्षाचे हायकमांड घेतील. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष या विषयावर आता जास्त चर्चा नको, असे डॉ. राऊत यांनी निक्षून सांगितले. 

हेही वाचा : तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय ही साखळी तुटणार नाही...

महाराष्ट्र हे राज्य भारत देशातच येते. याचा विसर बहुधा केंद्र सरकारला पडला असावा. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीतही केंद्र सरकारने राजकारण केले. महाराष्ट्राकडे जेवढे लक्ष द्यायला हवे होते, ते सरकारने दिले नाही. लसींचा पुरवठा योग्य प्रकारे केला नाही. परिणामी महाराष्ट्रातील लसीकरण केंद्र पडत चालली आहेत. अनेक केंद्रामध्ये लस पोहोचलीच नाहीत. त्यामुळे ती केंद्रे सुरूच झाली नाहीत. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सरळ सरळ सापत्न वागणूक दिली असल्याचा आरोप मंत्री नितीन राऊत यांनी केला. पण सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर बोलण्यास त्यांना स्पष्ट नकार दिला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख