डीसीपी पराग मानेरेसह तिघांविरोधात तक्रार, परमबीर सिंगांच्या अडचणी वाढल्या…

यापूर्वी मुंबईतील मरीन ड्राईव पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह ८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका बिल्डरच्या विरोधात खोटे प्रकरण दाखल करून १५ कोटी रुपये वसूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Parambir Sing
Parambir Sing

नागपूर : मुंबईच्या मरीन ड्राईव पोलिस ठाण्यात Marin drive police station of Mumbai दाखल झालेल्या तक्रारीनंतर काल पुन्हा ठाणे जिल्ह्याच्या Thane District कोपरी पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांच्या विरोधात अग्रवाल Agrawal नामक बिल्डरने तक्रार दाखल केली आहे. परमबीर सिंग यांच्यासह डीसीपी पराग मानेरे Parag Manere आणि तिघांच्या विरोधात जबरदस्ती वसुली केल्याचे सदर बिल्डरचे म्हणणे आहे. 

काल दाखल झालेल्या तक्रारीमुळे परमबीर सिंग यांच्या अडचणींत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांच्याकडून दोन कोटी रुपये रोख घेतले आणि त्याची जमीनसुद्धा हडप केली. ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणात पाच आरोपींवर किडनॅप करणे, जबरदस्ती वसुली करणे आणि फसवणूक करण्याचे आरोप लावण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपये वसूल केल्याचे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

त्यावेळी गुन्हे शाखेचे डीसीपी पराग मानेरे  होते, त्यांनीही परमबीर सिंग यांना मदत केली. मानेरे सध्या मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन आणि मनोज घोटकर यांच्याही विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी २ कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या ठाणे येथील बंगल्यात घेतली होती आणि ८ कोटी रुपयांची जमीन १ कोटी रुपयांत विकण्यासाठी दबाव टाकला होता, असेही अग्रवाल यांचे म्हणणे आहे. याशिवाय अग्रवाल यांच्या आईच्या नावावर असलेली ८ कोटी रुपयांची जमीन १ कोटी रुपयांत जबरदस्तीने विकायला लावल्याची आरोप त्यांनी केला आहे. 

यापूर्वी मुंबईतील मरीन ड्राईव पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह ८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका बिल्डरच्या विरोधात खोटे प्रकरण दाखल करून १५ कोटी रुपये वसूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. आता काल पुन्हा एक तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या कारवाईत जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com