पोलीस आयुक्तांनी आता तुकाराम मुंढेंना अटक करावी : आमदार कृष्णा खोपडे

मुंढे अनेक दिवसांपासून अध्यक्ष परदेशी यांनी आपल्याला मुख्याधिकारीपदी नेमल्याचे छातीठोकपणे सांगत होते. पण महापौरांनी अनेकदा मागणी करुनही त्यांनी याबाबतचे एकही पत्र दाखवले नव्हते. तर अध्यक्षांनी फोन करून पदभार दिल्याचे आयुक्त सांगत होते.
Krishna Khopde
Krishna Khopde

नागपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा असलेले नागपूर स्मार्ट सिटीची बैठक अखेर काल पार पडली. यामध्ये अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे मुख्य कार्यकारी अधिकारी नव्हतेच, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंढे यांनी सीईओ असल्याची बतावणी करुन घेतलेले सर्व निर्णय आणि केलेली सर्व कामे ही दंडनीय अपराध ठरतात. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. 

काल महानगरपालिकेच्या इमारतीतील कार्यालयात झालेल्या बैठकीचे निमंत्रण आमदार खोपडे यांनी दिले गेले नव्हते. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. महापौर संदीप जोशी यांनी मुंढेच्या गैरव्यवहाराची यापूर्वीच तक्रार सदर पोलिस ठाण्यात केली आहे. मुंढे अनेक दिवसांपासून अध्यक्ष परदेशी यांनी आपल्याला मुख्याधिकारीपदी नेमल्याचे छातीठोकपणे सांगत होते. पण महापौरांनी अनेकदा मागणी करुनही त्यांनी याबाबतचे एकही पत्र दाखवले नव्हते. तर अध्यक्षांनी फोन करून पदभार दिल्याचे आयुक्त सांगत होते. काल पार पडलेल्या बैठकीत मुंढे यांच्याच उपस्थितीत परदेशी यांनी आपण कुठलाच पदभार दिला नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे आजवर कोण खोटे बोलत हे स्पष्ट झाले आहे. 

मुंढे यांनी घेतलेले निर्णय दंडनीय अपराध आहे. महापौरांच्या तक्रारीवर पोलिस आयुक्तांनी त्वरित कारवाई करून मुंढे यांना अटक करावी, असे खोपडे म्हणाले. ते आघाडी सरकारचे राजकीय प्रतिनिधी म्हणूनच काम करताना दिसत आहे. भाजपच्या कार्यकाळत घेण्यात आलेल्या प्रकल्पांना रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही खोपडे यांनी केला. आयुक्त मुंढेंवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कारवाई करावी, यासाठी सत्ताधारी सरकावले आहेत. कालच्या बैठकीतही सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी असलेले संचालक मुंढे यांच्या विरोधात असल्याचे बघायला मिळाले. केवळ अध्यक्ष परदेशी यांच्यासोबतच मुंढे बोलले. इतर कुणाशीही ते बोलले नाही आणि त्यांच्याशीही कुणी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे बैठकीत मुंढे एकाकी पडले होते. कालच्या बैठकीनंतर मुंढेंच्या अडचणींत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.         (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com