आयुक्तांनी एका महिन्यात केले खासगी रुग्णालयांना सरळ

अतिजोखमीच्या कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे, यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी झोन स्तरावरएकूण ६५ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली. प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहे. तसेच नियंत्रण कक्षही स्थापित करण्यात आले आहेत.
Radhakrishnan
Radhakrishnan

नागपूर : राधाकृष्णन बी. यांनी महानगरपालिकेचा कार्यभार स्वीकारला तेव्हा केवळ सात खासगी रुग्णालयांत कोविडचे उपचार केले जायचे. उर्वरित रुग्णालय कोविड रुग्णांना सेवा देण्यास टाळाटाळ करीत होते. पण राधाकृष्णन यांनी खासगी रुग्णालयांना ताळ्यावर आणत ५३ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी सेवा उपलब्ध करून दिली. आज राधाकृष्णन बी. यांना महानगरपालिकेत रुजू होऊन एक महिना पूर्ण होतो आहे. या एक महिन्यांत त्यांनी आरोग्यसेवा बळकट करण्याला भर दिला आणि खासगी रुग्णालयांना सरळ केले.  

आयुक्त राधाकृष्णन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिनाभरात शहरातील आरोग्य सोयी सुदृढ करण्यावर भर दिला आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढावी, यासाठी त्यांनी आपला मोर्चा खासगी रुग्णालयांकडे वळविला. खासगी रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. खाटांची संख्या वाढविणे, चाचण्या वाढविणे, ॲम्बुलन्स, शववाहिकांची संख्या वाढविणे आणि कुठलाही त्रास न होता नागरिकांना आरोग्यसेवा तातडीने मिळणे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी केवळ सात खासगी रुग्णालयांत ३०० बेड्स होते. आता शहरातील एकूण ५३ रुग्णालये नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये १५१४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १९२२, असे एकूण ३४३६ बेड्स उपलब्ध आहेत. 

कोरोबाधित रुग्णांना बेड्सची वर्तमानस्थिती लक्षात यावी, यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक जारी करण्यात आला आहे. नागरिकांना गरजेच्या वेळी अचूक माहिती मिळावी, त्यांची भटकंती होऊ नये यासाठी मनपातर्फे ‘डॅशबोर्ड’ तयार करण्यात आला असून यामध्ये सर्व खासगी रुग्णालयांद्वारे त्यांच्याकडील बेड्सची ‘रियल टाइम’ माहिती अद्ययावत केली जाते. खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणाऱ्या देयकाचे बिलाचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नियुक्त करण्यात आले आहेत. मनपाची रुग्णालये सज्ज असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांअभावी ते सुरू करण्यास अडचण होती. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील शिक्षण पूर्ण झालेले ६० डॉक्टर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) येथून शिक्षण पूर्ण केलेल्या २०० डॉक्टरांना लवकरच नियुक्ती देण्यात येत आहे. 

प्रत्येक झोनमध्ये पाच ॲम्बुलन्स 
अतिजोखमीच्या कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे, यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी झोन स्तरावर त्यांनी एकूण ६५ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली. प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहे. तसेच नियंत्रण कक्षही स्थापित करण्यात आले आहेत.           (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com