"जिल्हाधिकारी सुमन चंद्रा तुमची अडचण काय आहे?' 

तुम्ही जर नियमांनी चाललात, तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कोवीडच्या युद्धात रात्री अपरात्री काम करण्यास आम्ही तयार आहोत. गेल्या तिन महीन्यात जिल्ह्याचा विकास थांबलेला आहे. तरीही आम्ही अद्याप एका पैशाचा आरोप कुणावर केलेला नाही. रेती घाटावर ट्रक-टिप्परच्या मागे रात्री-बेरात्री फिरायला जिल्हाधिकाऱ्यांना वेळ आहे, पण कोरोनाचे काम करण्यात का नाही,
Akash Fundkar
Akash Fundkar

नागपूर : जिल्हाधिकारी सुमन चंद्रा लोकप्रतिनिधींचेच नव्हे, तर कुणाचेही ऐकत नाही. राजपत्रित अधिकारी येवढे दबावात आहेत, की त्यांनी जिवाचे बरेवाईट करुन घेऊ नये, म्हणजे झाले. त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. हे असेच सुरू राहीले तर आपला जिल्हा रुग्णसंख्येत अकोल्याच्या पुढे जायला वेळ लागणार नाही. आताही जर त्या कोरोनाच्या बाबतीत गंभीर झाल्या नाही, तर त्यांच्यावर हक्कभंग आणावा लागेल, असे आमदार ऍड. आकाश फुंडकर म्हणाले. 
े 
ऍड. फुंडकर म्हणाले, केवळ महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवरच नव्हे, तर जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परीषदेचे, नगरपालिकेचे सीईओ, बीडीओ, बीओ सर्व प्रचंड दबावात आहेत. खामगाव तालुका हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांना बंगल्याचे नुतनीकरण करण्याचे सुचतेच कसे? आणि हे काम करताना त्यांनी कोणत्या निधीचा वापर केला, हे सांगितले पाहीजे. सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून अडीच कोटी रुपयांचा निधी दिला. त्याचासुद्धा उपयोग चंद्रा यांनी केलेला नाही. कुठलीही यंत्रसामग्रीची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. जिल्ह्यावर मोठ्या संकटाचे वादळ घोंघावत आहे. त्यामुळे आतातरी त्यांनी आपला ईगो सोडून सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी आणि काम सुरु करावे. 

त्यांच्या बंगल्यावर झालेला नुतनीकरणाचा खर्च त्यांनी कोणत्या निधीतून केला, हे जाहीर करावे. मान्यता घेऊन शासकीय नियमांनुसार कार्यवाही केली आहे का, हे सुद्धा सांगावे. या कामाला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही. त्यामुळे काम करणारा ठेकेदार हकनाक या कामात मरेल. नियोजन विभागाचे प्रमुख हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. पण या ईमारतीमध्येही जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांची, खासदारांच्या कॅबिनचीही अडचण होते. लोकप्रतिनिधी तेथे असल्यामुळे त्यांना काय त्रास होतो माहीती नाही, असा प्रश्‍न आमदार फुंडकरांनी केला. लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदावरुन काढण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार नाही. तो राज्य शासनाचा अधिकार आहे. पण त्या असे प्रयत्न करताना दिसताता. त्यामुळे त्यांच्या तुघलकी कारभाराच्या विरोधात सर्व लोकप्रतिनिधी आपल्या सोबत एकवटले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तुम्ही जर नियमांनी चाललात, तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कोवीडच्या युद्धात रात्री अपरात्री काम करण्यास आम्ही तयार आहोत. गेल्या तिन महीन्यात जिल्ह्याचा विकास थांबलेला आहे. तरीही आम्ही अद्याप एका पैशाचा आरोप कुणावर केलेला नाही. रेती घाटावर ट्रक-टिप्परच्या मागे रात्री-बेरात्री फिरायला यांना वेळ आहे, पण कोरोनाचे काम करण्यात का नाही, असा प्रश्‍न पडतो. रेतीच्या दंडांचे सर्व उद्दीष्ट पूर्ण झालेले असताना रात्री त्या का फिरतात, हे कुणाच्या लक्षात येत नाही, असे त्यांनी समजू नये. जर त्यांनी आपल्या कामात सुधारणा केली नाही, तर त्यांच्यावर हक्कभंग आणणार, असा इशारा आमदार आकाश फुंडकर यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com