जिल्हाधिकारी म्हणतात ऑक्सिजन मुबलक, मग का होताहेत मृत्यू ?

आतापर्यंत वैद्यकीय वापरासाठी १७९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. वैद्यकीय वापर व औद्योगिक वापर यासाठी राज्य शासनाने आरक्षण ठरवून दिले आहे. यानुसार वितरण केले जाते. या वाटपानंतरही आजमितीला ७६.६० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Corona
Corona

नागपूर : शहरात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मेडिकलमध्ये बव्हंशी मृत्यू पहाटे ३ ते ६ या वेळात झाले. याचे कारण त्या वेळात ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना न मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले. इकडे जिल्हाधिकारी म्हणतात, ऑक्सिजनचा साठा मुबलक आहे. नागपूर शहरात काल १७ सप्टेंबरपर्यंत ७६.६० मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ऑक्सिजनअभावी एकही कोरोनाबाधित दगावू नये, यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. 

ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमण काळातील पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत दररोज ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या बारा पुरवठादारांशी संपर्क साधला जातो. विविध पुरवठादारांकडे असणाऱ्या साठ्याची माहिती घेतली जाते. यामध्ये वर्धा व चंद्रपूर येथील पुरवठादारांचा समावेश आहे. आतापर्यंत वैद्यकीय वापरासाठी १७९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. वैद्यकीय वापर व औद्योगिक वापर यासाठी राज्य शासनाने आरक्षण ठरवून दिले आहे. यानुसार वितरण केले जाते. या वाटपानंतरही आजमितीला ७६.६० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश जारी केले होते. निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालयाचे परिवहन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य आहेत. तर सदस्य सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासन नागपूर या विभागाचे साहाय्यक आयुक्त आहेत. यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधता येणार आहे. ऑक्सिजन संदर्भातील अडचणीसाठी ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com