३५८ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहआरोपी अपघातात ठार - co accused in rs three hundred fifty eight crore scam killed in accident | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

३५८ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहआरोपी अपघातात ठार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

शनिवारी ३ एप्रिल रोजी आरोपीची न्यायालयात पेशी आटोपल्यानंतर त्याला परत भंडारा कारागृहात परत घेऊन येत होते. राजनी फाट्याजवळ पोलीस वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने तीन वेळा रस्त्यावरच पलटले आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.

नागपूर : भंडारा कारागृहात बंदिवान असलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या ३५८ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहआरोपीची मुंबई न्यायालयात पेशी आटोपून त्याला परत भंडाऱ्याकडे जात असताना पोलिस वाहनाच्या झालेल्या अपघातात मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या राजनी फाट्याजवळ टायर फुटल्याने वाहनाने तीन पलट्या खाल्ल्या. यामध्ये सहआरोपी श्रावण बावणे ठार झाला असून तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला. 

मृत आरोपी ६५ वर्षीय श्रावण बावणे असून पोलीस कर्मचारी सावंत जाधव, शकील शेख आणि अभिषेक घोडमारे अशी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भंडारा येथील कारागृहात असलेला कैदी श्रावण बावणे याची मुंबई येथील न्यायालयात तारीख होती. भंडारा येथील तीन पोलीस कर्मचारी आरोपी श्रावणला घेऊन एम.एच. 36 2273 क्रमांकाच्या पोलीस वाहनाने मुंबई येथे घेऊन गेले होते. शनिवारी ३ एप्रिल रोजी आरोपीची न्यायालयात पेशी आटोपल्यानंतर त्याला परत भंडारा कारागृहात परत घेऊन येत होते. राजनी फाट्याजवळ पोलीस वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने तीन वेळा रस्त्यावरच पलटले आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यात आरोपी श्रावण बावणे याचा जागीच मृत्यू झाला. तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच मार लागल्याने त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

कैदी श्रावण बावणे याचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल चार ते पाच तास मृतदेह पोलीस वाहनातच पडून असल्याची माहिती आहे. यात विशेष बाब अशी की भंडारा येथील कारागृहात असलेला बंदिवान श्रावण बावणे याच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या ३५८ कोटी रुपयांच्या घोटाळ्यासह विविध भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यातील आरोपाखाली तो कारागृहात बंदिस्त होता. अपघातात तो ठार झाल्याची माहिती मिळताच आर्वी पोलिसांसह वर्धा येथील मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळ गाठत तपास सुरू केला आहे. आता आरोपीच्या अपघाती मृत्यूनंतर भंडारा पोलिस या अपघाताची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख