मुख्यमंत्री घरात, अजितदादा पुण्यात पण गडकरींनी विदर्भाला सांभाळले.... - CM at home and ajitdada in Pune but Gadkari look after Vidharbha Says Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री घरात, अजितदादा पुण्यात पण गडकरींनी विदर्भाला सांभाळले....

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

गडकरींच्या कामाची अनेकांकडून प्रशंसा

नागपूर : कोविडच्या धास्तीने मुख्यमंत्री घराच्या बाहेर तर उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर पडत नाही, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाला सांभाळल्याचे सांगितले. (CM at home and ajitdada in Pune but Gadkari look after Vidharbha Says Fadnavis)  

भाजपच्या कार्यकारिणीच्या (BJP Executive comitee)  बैठकीत ते बोलत होते. गडकरी यांनी देशाच्या अनेक भागातून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, आरटीपीसीआर व्हॅन आणली. आपल्या भागात रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू केले. पक्षाने ‘सेवा ही संघटन’ अभियान राबवले. रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, औषधांसाठी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. तथापी, कोव्हिडनंतर अनेक त्रास उद्भवत असल्याने त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही पण बातमी वाचा : लाॅकडाऊन सरकार वाढवणार का, राजेश टोपे म्हणाले....

आता लक्ष ठेवा

ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्याने त्याचा योग्य वापर होत आहे की नाही, याचे ऑडिट व्हावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. कोविडने अनेक कार्यकर्ते गमावले. त्यामुळे प्रत्येकाने नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. शहाराला २६०-२७५ मेट्रिक टनची गरज असताना नागपुरात ९० मेट्रिक टनचे उत्पादन होत होते. त्यासाठी प्रयत्न करून ऑक्सिजन मिळवण्यात आले. मेयो, मेडिकल, एम्ससह ७-८ रुग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन उपलब्ध केले आहे. दत्ता मेघे मेघे व रणजित देशमुख यांच्या समूहातील रुग्णालयांनी ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. अमरावतीसह विदर्भाच्या सर्व क्षेत्रात ऑक्सिजन देण्यात येत आहे. चंद्रपूरमध्ये ४०० बेड्सच्या रुग्णालयाला ऑक्सिजनसाठी वेकोलिने सहकार्य केले आहे, असेही गडकरी म्हणाले. बैठकीला विदर्भाचे संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, नरेंद्र बोरकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख