राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या  : डॉ. परिणय फुके - choose a social worker not a politician said dr parinee phuke | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या  : डॉ. परिणय फुके

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

संदीप जोशी यांनी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते, लघू उद्योग मंडळाचे अध्यक्ष, महापौर या सगळ्याच पदांना न्याय दिला. लोकांच्या चिरकाल स्मरणात राहतील, अशी असंख्य कामे केली. भविष्यातही ते उत्तमच कामे करतील, तरुणांचे, शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावतील.

भंडारा : पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री, आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले. 

भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या मोहाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. लाखनी येथील प्रचारसभेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेनेसुद्धा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थन दिले. संदीप जोशी यांनी लाखनी शहरातील समर्थ विद्यालयात दिवंगत बापुसाहेब चिखलीकर यांच्या स्मृतीला वंदन केले व शिक्षकवृंदांशी संवाद साधला.

संदीप जोशी यांनी आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, जवाहरनगर आदी ठिकाणी संपर्क दौरा केला. विविध ठिकाणी झालेल्या सभांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री आमदार डॉ.परिणय फुके, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, महिला आघाडी अध्यक्ष गीता कोंडेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, डॉ. कल्याणी भुरे, डॉ. हिवराज जमीरवार, डॉ. गोविंद कोठाणी, जिल्हा महामंत्री मुन्नाभाऊ फुंडे, तुमसर शहराध्यक्ष ॲड. आशिष कुबडे, तुमसर ग्रामीण अध्यक्ष ॲड. विजय पारधी, महिला नेत्या कुंदाताई वैद्य, मोहाडी येथील विकास फाउंडेशनचे हंसराजजी आगासे, यादवराव कुंभारे, अफरोज पठाण, माजी सभापती हरिश्चंद्र बंदाटे, सेवक चिन्नलोरे, चंद्रशेखर भिवगडे, बंडूभाऊ बनकर, मेहताष ठाकुर, लाखनी येथे आल्हाद भांडारकर, मधुकर लाड, धनंजय घाटबांधे, भरत खंडाईत, शिक्षक परिषदेचे के.डी. रोकडे, महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे रवी रहांगडाले, साकोली येथे डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, भाजप तालुकाध्यक्ष लखन बर्वे, रेखाताई भाजीपाले, सैय्यद मुजानद्दीन, घनश्याम निखाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार उपस्थित होते.  

आमदार डॉ परिणय फुके म्हणाले, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा पंडित बच्छराज व्यास, गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड आहे. पदवीधरांचा प्रतिनिधी हा पदवीधरच असावा, असे सांगणाऱ्या प्रा. अनिल सोले यांचाही गड आहे. पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी, असा कर्तृत्ववान उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिला, याचा आनंद आहे.

संदीप जोशी यांनी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते, लघू उद्योग मंडळाचे अध्यक्ष, महापौर या सगळ्याच पदांना न्याय दिला. लोकांच्या चिरकाल स्मरणात राहतील, अशी असंख्य कामे केली. भविष्यातही ते उत्तमच कामे करतील, तरुणांचे, शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावतील. रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतील, यात काही शंका नसावी, कार्यकर्ता ते महापौर असा संदीप जोशी यांचा प्रवास आहे. यावेळी पक्षाने संदीप जोशी या युवा कार्यकर्त्याला संधी दिली आहे. आपण आपली पहिली पसंती त्यांच्या पारड्यात टाकू, एक चांगली निवड करू. अव्याहत कामे करणाऱ्या आपल्या संदीप जोशींचा सन्मान करू, असे आवाहनही माजी राज्यमंत्री आमदार डॉ परिणय फुके यांनी केले. 

आमदार विनोद अग्रवाल यांचेही समर्थन
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही पदवीधर निवडणुकीसाठी संदीप जोशी यांना पूर्ण समर्थन दिले. समर्थनासह विनोद अग्रवाल यांनी गोंदिया शहरातील विशाल लॉन येथे भव्य सभा घेतली. सभेमध्ये बहुसंख्य पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख