चिराग मजलानीने पलटवली साक्ष, म्हणाला माझा ‘तो’ जबाब पोलिसांनीच लिहिला होता… - chirag majlani said my answer was written by police testimony reserved | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

चिराग मजलानीने पलटवली साक्ष, म्हणाला माझा ‘तो’ जबाब पोलिसांनीच लिहिला होता…

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 मे 2021

त्याने पोलिस चौकशीत पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याचा घेतलेला जबाब हा पोलिसांनीच लिहिला असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. सोनू जालानने या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Former Mumbai Police Commissioner Parambir Singh यांनी गंभीर आरोप लावले होते. या प्रकरणाच्या श्रृंखलेमध्ये क्रिकेट बुकी सोनू जालानच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणातील एक साक्षीदार चिराग मजलानी Chirag Majlani याने पूर्वी परमबीर यांच्या पक्षात साक्ष दिली होती. पण आता एसआयटी करीत असलेल्या चौकशीत त्याने आपली साक्ष पलटवली आहे. He has changed his testimony during the interrogation

साक्षीदार चिरागने साक्ष पलटवल्यामुळे परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन २०१७ मध्ये ठाणे खंडणीविरोधी पथकाने क्रिकेट बेटिंगमध्ये बुकी सोनू जालान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग SIT कडून सुरू आहे. यादरम्यान प्रकरणाला एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणी गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींनाही चौकशीला बोलावले जात असताना, चिराग मजलानी या साक्षीदाराने पलटी मारली आहे. त्याने ठाणे पोलिसांवरच उलट गंभीर आरोप केला आहे.

सोनुने त्याच्याविरोधात क्रिकेट बेटिंगचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं म्हटलं होतं. या गुन्ह्याबाबत त्याने राज्याचे गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर ठिकाणी तक्रार नोंदवून दाद मागितली होती. सोनुवर क्रिकेट बेटिंग प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात चिराग मजलानी याने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. चिराग मजलानीने आधी सोनू जालानविरोधात साक्ष दिली होती. आता त्याने पोलिस चौकशीत पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याचा घेतलेला जबाब हा पोलिसांनीच लिहिला असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. सोनू जालानने या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : क्षमता असणाऱ्या व्यक्तींनाच भेटा..तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल..राणेंनी दिला संभाजीराजेंना सल्ला..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व पोलिस महासंचालक (होमगार्ड) परमबीरसिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीरसिंग यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर हा  गुन्हा दाखल झालेला आहे. परमबीर सिंग यांनी देशमुखांवर १०० कोटीच्या खंडणीचाही आरोप केला आहे. या प्रकरणातही परमबीर सिंग यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. घाडगे यांच्या आरोपांची गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख