मुख्याधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’, अन् राष्ट्रवादीने दालनाला लावले बेशरमीचे हार...

कोरोना महामारीची तिसरी लाट उद्भवण्याच्या तयारीत असताना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी न करता घरी बसूनच नगर पालिकेचा कारभार करीत आहेत. ते नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याचा निवेदनात उल्लेख केले आहे.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

बुलडाणा : जिल्ह्यातील चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सध्या कार्यालयात येत नाहियेत. कार्यालयाचा कारभार ते घरूनच करत आहेत. त्यातही केवळ बिलं पास करण्याकडेच त्यांचा जास्त कल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज त्यांच्या दालनाला बेशरमच्या झाडाच्या पाना-फुलांचा हार लावला. राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. The Unique movement of ncp is being discussed all over the district. 

चिखलीचे मुख्याधिकारी हे गत काही महिन्यांपासून कार्यालयात हजर राहत नसून सर्व कारभार हा घरूनच चालवतात. अन् ते ही फक्त बिलं काढण्याचे काम करत असून नागरिकांच्या समस्या कोण सोडवणार, असा प्रश्न उपस्थित करत आज चिखली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुख्याधिकारी यांच्या दालनाला बेशरमीच्या पानाफुलांचा हार चढवून चिखली तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयात पूर्ण वेळ हजर राहण्याबाबत आदेशीत करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

निवेदनानुसार, नगर परिषद चिखली येथील मुख्याधिकारी हे आपल्या कार्यालयात नेहमी गैरहजर असल्याने निवासस्थानावरूनच नगर परिषदेचा मनमानी कारभार चालवीत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरात नागरी समस्या भेडसावत आहेत. नाले सफाई न झाल्यामुळे शहरात डेंगू, मलेरिया यांसारखे भयंकर साथीचे रोग वेगाने पसरत आहेत. साफसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

कोरोना महामारीची तिसरी लाट उद्भवण्याच्या तयारीत असताना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी न करता घरी बसूनच नगर पालिकेचा कारभार करीत आहेत. ते नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याचा निवेदनात उल्लेख केले आहे. मुख्याधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत हजर राहण्याबाबत आदेशीत करण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी काँगेस पक्ष यापेक्षाही वेगळे आणि तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com