मुख्यमंत्री साहेब, आमच्या किडण्या घ्या; पण आता मशागतीसाठी पैसे द्या...

पीक कर्जाचा आकडा १ हजार कोटी रुपयांनी कमी होणे योग्य नाही. पीक कर्जाची रक्कम जी कमी झाली, यामध्ये अधिकाऱ्यांची चूक आहे. आता चुका काढत बसण्याची वेळ नाही, तर शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

बुलडाणा : यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी अवघड परिस्थिती घेऊन आलंय. शेतकऱ्यांकडे मशागतीसाठी पैसे नाहीत Farmers do not have money for cultivation अन् बॅंकेनेही कर्ज दिले नाही. आता कुठलाही पर्याय उरला नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी आपल्या किडण्या विकायला काढल्या आहेत. Farmers have taken their kidneys for sell तशी परवानगी त्यांनी मुख्यमंत्र्यांना Chief Minister पाठवलेल्या पत्रातून मागितली आहे. जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील वाकोडी गावातील पाच शेतकऱ्यांना हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

इंधनाचे भाव आकाशाला भिडल्याने यावर्षी सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके, पेट्रोल, डिझेल सर्वच महागले आहे. परिणामी शेतीच्या मशागतीचा खर्चही वाढला आहे. त्यात अजून कहर म्हणजे बॅंकांना यावर्षी पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे आता मशागत कशी करावी, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना दुसरा कुठला मार्ग सुचला नसल्याने त्यांनी हा आत्मघातकी निर्णय घेतला आहे. वाकोडी गावातील पाच शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना तसे पत्र पाठवले आहे. किडण्याही विकल्या गेल्या नाहीत, तर मग मरण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे शिल्लक नाही, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

नाना पटोले म्हणाले अधिकाऱ्यांची चूक
जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेत असताना उपरोक्त मुद्दा उपस्थित झाला. जिल्हा उपनिबंधकही तेथे होते. बुलडाणा जिल्ह्यात २४०० कोटी रुपयांपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटले जात होते. यावर्षी ते १४०० कोटी रुपयांवर आले आहे. १ हजार कोटींनी पीक कर्ज कमी झाले. याबद्दल जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांना विचारणा केली तेव्हा जिल्हा उपनिबंधकांच्या बोलण्यामध्ये समस्या जाणवली. तसे पाहिले तर, दरवर्षी पीक कर्जाचे आकडे दरवर्षी वाढायला पाहिजे. पण यावर्षी आकडा कमी झालेला दिसतोय. शेती दरवर्षी महाग होत चालली आहे. त्यामुळे पीक कर्जाची रक्कम देखील वाढली पाहिजे, असे सरकारचे स्पष्ट मत असल्याचे नाना पटोले यांनी आज सांगितले. त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात आज ते बुलडाणा जिल्ह्यात आहेत.  

पीक कर्जाचा आकडा १ हजार कोटी रुपयांनी कमी होणे योग्य नाही. पीक कर्जाची रक्कम जी कमी झाली, यामध्ये अधिकाऱ्यांची चूक आहे. आता चुका काढत बसण्याची वेळ नाही, तर शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे दोषी कोण हे नंतर बघू पण आधी कर्ज उपलब्ध करून देऊ. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळाले पाहिजे, तत्काळ मिळाले पाहिजे आणि भरीव मिळाले पाहिजे. जेणेकरून मशागतीसह शेतीची कामे करताना त्यांना अडचणी येणार नाही. आज शेतकऱ्यांनी किडण्या विकण्याची भाषा केली, असे यापुढे व्हायला नको. त्यासाठी सर्व खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com