मुख्यमंत्री म्हणाले, नितीनजी मला तुमची मदत हवीय…

नागपूरचा विकास होणे गरजेचे आहे. आपण विद्यापीठ कॅम्पसपासून ते आरटीओपर्यंत उड्डाणपूल करत आहोत. तसेच वाडी या भागात देखील एक उड्डाण पूल केला जाणार आहे. याचप्रमाणे मध्य, पूर्व, उत्तर आणि दक्षिण नागपूर हा विभागाचा देखील विकास होणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, नितीनजी मला तुमची मदत हवीय…
Uddhav Thackeray - Nitin Gadkari

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या हस्ते आज कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित झाले होते. ‘सध्या राज्यावर जी संकटे ओढावली जात आहेत. त्यातून कायमस्वरुपी सावरण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे.’, अशी साद मुख्यमंत्र्यांनी गडकरींना घातली. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडकरींच्या मुंबई-पुणे हायवेच्या कामापासून ते आजतागायत केलेल्या सर्व कामांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, नितीन गडकरी मी उगाचच आपलं कौतुक करत नाही. मला ते दिवस आठवतात, जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही मुंबई आणि पुणे या दोन शहरातील अंतर कमी केलं होतं. स्वप्न प्रत्यक्षात आणणं यासाठी मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मी करतो किंवा बघतो असं म्हटलं असतं. मात्र, तुम्ही ते करून दाखवलं. आता तीच एक तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वातून देशभरात निर्माण करत आहात. 

राजकारण वेगळे आणि विकास कामे ही वेगळी असतात. विकास कामांमध्ये राजकारण न आणण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा तुम्ही जोपासली आहे. राज्यावर सध्या जे वादळ घोंघावत आहे. त्यातून तात्पुरता मार्ग दरवर्षीच काढला जातो. पण आता पुराच्या फटक्यापासून वाचण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. पुढच्या पावसाळ्यात राज्यावर असे संकट ओढवूच नये, यासाठी तुमच्या टेक्नॉलॉजीची आज मला गरज आहे. या महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न तुम्ही नेहमीच पाहात आला आहात. त्यामुळे या संकटात तुम्ही महाराष्ट्राची मदत नक्कीच कराल, अशा साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी गडकरींना घातली. 

यावेळी गडकरी म्हणाले, नागपूरचा विकास होणे गरजेचे आहे. आपण विद्यापीठ कॅम्पसपासून ते आरटीओपर्यंत उड्डाणपूल करत आहोत. तसेच वाडी या भागात देखील एक उड्डाण पूल केला जाणार आहे. याचप्रमाणे मध्य, पूर्व, उत्तर आणि दक्षिण नागपूर हा विभागाचा देखील विकास होणे गरजेचे आहे.  त्यांना चांगल्या गुणवत्तेच जीवन मिळणं गरजेचं आहे. झोपडपट्टीतील लोकांना मालकी हक्काचे घर देखील देऊ. मी आपल्या विभागातून सेंट्रल रोड फंडातून हे सर्व पैसे मंजूर केले आहेत आणि यापुढेही ते देऊ, असा शब्द त्यांनी दिला. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in