चंद्रशेखर बावनकुळेंवर चंद्रकांत पाटलांनी टाकली ‘ही’ जबाबदारी !

राज्यात भाजपाचे सरकार नाही. सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे यावेळी ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या या जबाबदारीचे महत्त्व वाढले आहे.
Chandrashekhar Bawankule - Chandrakant Patil
Chandrashekhar Bawankule - Chandrakant Patil

नागपूर : लवकरच होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने पुन्हा एक नवी जबाबदारी सोपविली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभाग निवडणूक प्रमुख म्हणून बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. 

पदवीधर निवडणुकीत बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपाला दणदणीत यश मिळेल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नियुक्ती पत्रात व्यक्त केला आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सातत्याने निवडून येत आहेत. हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदार संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे. अनिल सोले या मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. 

राज्यात भाजपाचे सरकार नाही. सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे यावेळी ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या या जबाबदारीचे महत्त्व वाढले आहे.  

(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com