केंद्रीय पथकाने दिला इशारा, कोरोनाचा नवीन स्ट्रेन अमरावतीकरांच्या उंबरठ्यावर...  - central team warns new strain of corona on the threshold of amravatikar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

केंद्रीय पथकाने दिला इशारा, कोरोनाचा नवीन स्ट्रेन अमरावतीकरांच्या उंबरठ्यावर... 

सुधीर भारती 
मंगळवार, 13 एप्रिल 2021

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर तसेच ऑक्‍सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत आहे. कुठेही कमतरता दिसून येत नाही. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची किंमत पीडीएमसीमध्ये 900 ते 1 हजार, तर खासगी कोविड हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये 1600 ते 1700 रुपये, अशी किंमत निर्धारित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. 

अमरावती : केंद्र सरकारचे आरोग्य पथक सध्या अमरावती जिल्ह्याच्या दोऱ्यावर आहे. त्यांनी केलेल्या पाहणीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावतीची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. पण याचा अर्थ लोकांनी गाफील रहावे, असा नाही. अत्यंत धोकादायक असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा सामना केव्हाही करावा लागू शकतो, अशी शक्यता या पथकाने वर्तविली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस फार महत्वाचे आहेत, असे पथकातील सदस्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले, की जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. मात्र त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. कोरोनाशी आता ही आरपारची लढाई आहे. त्यामुळे जनतेने येवढे दिवस संयम दाखवला, आता थोडीही हयगय करू नये. एकदा ही साखळी तोडणे आवश्‍यक आहे. आता जर आपण सांभाळले गेलो नाही. तर कोरोनाचा नवीन स्ट्रेन आपल्याला थोडीही संधी देणार नाही. त्यामुळे जिल्हावासीयांनी त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केले आहे. 

20 हजार लशींचा पुरवठा 
राज्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातसुद्धा लशींचा तुटवडा निर्माण झालेला असून अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. शासनाकडून जिल्ह्यासाठी 20 हजार लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्याचा विश्‍वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाच ते सहा दिवसांनी पुन्हा लशींची खेप येणार, असे त्यांनी सांगितले. 

नागपूरवरून रुग्णांची गर्दी वाढली 
नागपूर तसेच इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत. सुपर स्पेशालिटी व पीडीएमसी कोविड हॉस्पिटलमध्ये 60 तसेच शहरातील अन्य खासगी कोविड हॉस्पिटल्समध्ये नागपूर जिल्ह्यातील जवळपास 150 रुग्ण उपचार घेत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा : आता ‘ही’ कामेही आम्हीच करायची का, पोलिसांचा सवाल…
 
रेमडेसिव्हिर, ऑक्‍सिजनची कमतरता नाही 
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर तसेच ऑक्‍सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत आहे. कुठेही कमतरता दिसून येत नाही. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची किंमत पीडीएमसीमध्ये 900 ते 1 हजार, तर खासगी कोविड हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये 1600 ते 1700 रुपये, अशी किंमत निर्धारित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख