भाऊ, सरकार दीड हजार देणार आहे म्हणे; पण कधी मिळतील, माहीत नाही... - brother government will give one thousand and five hundred but do not know when | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

भाऊ, सरकार दीड हजार देणार आहे म्हणे; पण कधी मिळतील, माहीत नाही...

चंद्रशेखर महाजन 
मंगळवार, 4 मे 2021

गेल्या दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागपूर विभागात तीन लाख २० हजार कामगारांची नोंद झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. त्यावर विसंबून असलेली कामेही बंद झाली आहेत.

नागपूर : कोरोनाच्या महामारीत सर्व उद्धवस्त होत चालले आहे. सर्वाधिक फटका बसला आहे, तो म्हणजे असंघटित कामगारांना. त्यातल्या त्यात बव्हंशी जिल्ह्यांत रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने मजुरांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. असंघटित कामगारांच्या व्यथा तर वेगळीच कहाणी सांगतात. इमारत बांधकाम कामगार अजय पाटील म्हणाले, ‘भाऊ सरकार दीड हजार देणार आहे म्हणे. ते कधी मिळतील, याचा नेम नाही.’, त्यामुळे जगावे कसे, हा प्रश्‍न पडला आहे. हा एक नव्हे तर हजारो, लाखो अजय पाटलांचा प्रश्‍न आहे. 

काही कामगारांशी बोलणी केली असता ते म्हणाले, नोंदणीचा फार्म कोठे भरतात, हेही माहीत नाही. गेल्या २० वर्षापासून इमारतीच्या बांधकामावर आहे. साधी कोणती योजना मिळत नाही. कोरोनाने तर आमच्या चुलीच विझविल्या आहेत. प्रश्न गंभीर आहे, कसे जगायचे कळत नाही. आता तर जगायचीही इच्छा होत नाही. तुम्हीच सांगा काय करायचे, कसे जगायचे. हा प्रश्न एका अजय पाटीलचा नाही तर हजारो असंघटित कामगारांचा आहे. गेल्या दोन महिन्यांत ठिय्यावर काम नसल्याने हजारो कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात १४ लाख नोंदणीकृत कामगार आहेत, हे विशेष. 

अजय पाटील हे हुडकेश्वर भागात राहतात. इमारत बांधकाम करतात. गेल्या दोन महिन्यापासून काम बंद झाले. काही दिवसांपूर्वी काही काम मिळायचे. मात्र आता पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे घरी राहून दिवस काढावे लागत आहे. कोरोनाची स्थिती किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. मात्र आमच्या समोर जगण्यामरण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे, असे अजय पाटील सांगतात. असे एक नाही हजारो अजय पाटील यांची जगण्यासाठी मरमर सुरू आहे. राज्यामध्ये १४ लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. तर दोन लाखांपेक्षा अधिक बेरोजगारांनी नोंदणी अर्ज केला आहे. मात्र, दोन महिन्यापासून कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाउन आहे. त्याचा थेट परिणाम असंघटित क्षेत्रातील कामगारांवर झाला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागपूर विभागात तीन लाख २० हजार कामगारांची नोंद झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. त्यावर विसंबून असलेली कामेही बंद झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रामध्ये बेरोजगाराची संख्या वाढली आहे. यातील हजारो मजूर भाड्‌याच्या घरात राहत असून येणाऱ्या काळात त्यांना घरभाडे देणेही मुश्‍कील होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून घरमालक त्यांना घराबाहेर काढत असल्याचे धक्‍कादायक प्रकार काही भागात उजेडात आले आहेत. 

हेही वाचा : कोरोनाच्या लढाईत खाजगी डॉक्टर, नर्स, संस्था महत्त्वाच्या 

राज्य शासनाने जाहीर केलेली दीड हजारांची मदत ३ लाख ३० हजार नोंदणीकृत कामगारांनी वाटप करण्यात आली आहे. ही रक्कम ४८ कोटी रुपयांची आहे. ज्या कामगारांना ही रक्कम मिळाली नाही. त्यांना तातडीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कामगारांचे हित जपण्यासाठी कटिबद्ध आहोत. 
- राजदीप धुर्वे, सहायक कामगार आयुक्त, नागपूर.

सरकारने असंघटित क्षेत्रातील लोकांची मदत करणे गरजेचे आहे. कोरानाच्या काळात राज्य सरकारने दिलेली रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. यात वाढ करावी, अशी आमची मागणी आहे. 
हरीभाऊ गाडबैल, कामगार व शेतकरी नेते, नागपूर.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख