Breaking : उद्धव म्हणाले होते, योगींच्या थोबाडीत चप्पल मारावी वाटली; भाजपने केला व्हिडिओ व्हायरल...

भाजपही आपल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या अवमान विरोधात पोलिसांत जाण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात लवकरच पाच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
Breaking : उद्धव म्हणाले होते, योगींच्या थोबाडीत चप्पल मारावी वाटली; भाजपने केला व्हिडिओ व्हायरल...
Yogi - Uddhav Thackeray

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली काढण्याची भाषा केल्यानंतर राज्यभर वादळ उठले. आता उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या थोबाडीत चप्पल मारण्याची भाषा केली होती. याविरोधात भाजप यवतमाळ जिल्ह्याच्या पाच पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करणार आहे. 

मुख्यमंत्र्यांबद्दल असभ्य भाषा बोलल्यामुळे राणे यांच्यावर गुन्हे दाखल होणे, अटक आणि जामीन हा घटनाक्रम काल दिवसभर महाराष्ट्राने अनुभवला. त्यानंतर आज हे प्रकरण शांत होईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांविरोधात आजही वक्तव्य जारी करत आहेत. त्यातच आज यवतमाळचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन मुंदडा यांनी उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरलेला तो व्हिडिओ व्हायरल केला. आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पाच पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करणार असल्याचे मुंदडांनी सांगितले. 

भाजप-शिवसेना वाद आणखीन उफाळण्याची शक्यता दिसून येत आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांच्या विरोधात विविध ठिकाणी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेकडून काल गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपही आपल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या अवमान विरोधात पोलिसांत जाण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात लवकरच पाच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. 

दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्या विरोधात तक्रारीनंतर आता भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देऊन शिवसेनेला घेरण्याच्या तयारीत दिसून येत आहे. एकंदरीत पाहिलं तर शिवसेना-भाजप वाद आणखीन उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in