ममता बॅनर्जींच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर...

तृणमूलचे गुंड कार्यकर्ते व ममता सरकार संघटितरीत्या भाजपा कार्यकर्त्याची लूट करीत आहे. त्यांची ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढावीच लागेल. तेथील राजकीय दहशतवाद ठेचून काढावाच लागेल
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

पुसद (जि. यवतमाळ) ः पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (West Bengal Assembly elections) तृणमूल काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यांनी तेथील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ला चढवून जाळपोळ, लूट व हिंसा घडवून आणली. काही ठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवरही हल्ला केला आणि विनयभंगाचे प्रकारही तृणमूल कार्यकर्त्यांनी केले. (BJP women workers were also attacked) या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या किसान मोर्चाचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख महेश नाईक (Mahesh Naik) यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.  

नही चलेगी नही चॅलेंगी ममता तेरी दादागिरी नही चलेगी, जलोष नही ये उन्माद है, ममता बॅनर्जींचा धिक्कार असो, अमानवीय कृत्याचा निषेध असो, ममता दीदी हाय हाय, तृणमूल अब तेरी खैर नही अशा घोषणांनी स्थानिक बस स्थानक महात्मा फुले चौक दुमदुमून गेला. यावेळी महेश नाईक यांनी तृणमूल कार्यकर्त्यांनी चालवलेल्या हिंसाचाराचा निषेध करताना या हिंसाचाराला ममता सरकारचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप केला. (Mamata government of supporting the violence) पश्‍चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्तेही त्या राज्याचे नागरिक आहेत. पण तेथीही बाब लोकशाहीसाठी गंभीर आहे. (This matter is serious for democracy) नवनिर्वाचित ममता सरकार आपल्याच राज्यातील नागरिकांची हत्या घडवून आणत आहे. आपल्याच राज्यात हिंसा माजवत आहे.  

तृणमूलचे गुंड कार्यकर्ते व ममता सरकार संघटितरीत्या भाजपा कार्यकर्त्याची लूट करीत आहे. त्यांची ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढावीच लागेल. तेथील राजकीय दहशतवाद ठेचून काढावाच लागेल, असे महेश नाईक यावेळी म्हणाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराला जबाबदार असलेले  तृणमूल कार्यकर्ते व त्यांची म्होरक्या ममता बॅनर्जी यांच्या कायदेशीररीत्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे. 

या निषेध आंदोलनात प्रामुख्याने किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वजित सरनाईक, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पुरोहित, कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब उखालकर, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर वानखेडे, ओबीसी आघाडीचे  जिल्हा सचिव लक्ष्मणराव आगाशे, उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा महामंत्री संजय पांडे, आध्यात्मिक आघाडीचे राज्य सदस्य संतोष महाराज, आर्य राम जन्मभूमी अभियानाचे शहरअध्यक्ष हरीश चौधरी, विधी सेलचे कैलास वानखडे, किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री संजय लोंढे, विलासराव वानखडे, चंद्रकांत कांबळे, प्रशांत देशपांडे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री पल्लवी देशमुख, कांचन देशपांडे, कल्पना वाघमारे व भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी तृणमूल कॉंग्रेसचा निषेध केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com