ऊर्जामंत्र्यांच्या घरावर धडकल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या 

लॉकडाउनमुळे कुणाच्याही हाताला काम नव्हते. सर्वच घटक आर्थिक विवंचनेत असल्याने लॉकडाउनच्या काळातील शंभर दिवसांचे वीजबिल रद्द करा. ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना शंभर युनिट वीज मोफत देण्याचे सूतोवाच केले होते. हा शब्द खरा करून 300 युनिट वीज माफ करावी, चुकीच्या पद्धतीने आकारलेले व्याज व कर रद्द करावे.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : भरमसाट वीजबिलाच्या विरोधातील आंदोलन भारतीय जनता पक्षाने अधिक तीव्र केले आहे. भाजपच्या महिला आघाडीने काल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या बेझनबाग येथील घरावर धडक देत वीजबिल माफ करण्याची मागणी केली. "वीजबिल रद्द करा, नाहीतर खुर्ची खाली करा' अशा घोषणा देत महिलांनी गर्भीत इशाराही दिला. 

लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल महावितरणकडून ग्राहकांना पाठविण्यात आले आहे. अवाजवी वीजबिल आल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष आहे. भारतीय जनता पक्षानेही याविरोधात जनआंदोलन सुरू केले असून टप्प्याटप्प्याने ते तीव्र केले जात आहे. त्याच शृंखलेत सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या घरापुढे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने डॉ. राऊत यांच्या घरासमोर येत सरकार व ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

लॉकडाउनमुळे कुणाच्याही हाताला काम नव्हते. सर्वच घटक आर्थिक विवंचनेत असल्याने लॉकडाउनच्या काळातील शंभर दिवसांचे वीजबिल रद्द करा. ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना शंभर युनिट वीज मोफत देण्याचे सूतोवाच केले होते. हा शब्द खरा करून 300 युनिट वीज माफ करावी, चुकीच्या पद्धतीने आकारलेले व्याज व कर रद्द करावे, वीज दरवाढ किमान वर्षभरासाठी रद्द करावी, आदी मागण्या आंदोलनकर्त्या महिलांनी रेटल्या. 

उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात माजी महापौर माया इवनाते, महापौर अर्चना डेहनकर, नंदा जिचकार यांच्या सोबतच माजी आमदार डॉ. मिलिंद माने, विक्की कुकरेजा, भोजराज डुंबे, धर्मपाल मेश्राम, संजय बंगाले, विमल श्रीवास्तव, अमित पांडे, शिवानी दाणी, मनीषा काशीकर, लता येरखेडे, मंगला गोतमारे, सुषमा चौधरी, प्रमिला माथरानी, मनोरमा जैसवाल, नीता ठाकरे, कल्पना पजारे, भाग्यश्री कानतोडे, कंचन करमरकर, अश्विनी जिचकार, संध्या ठाकरे, अनसूया गुप्ता, प्रीती राजदेरकर, निशा भोयर, सीमा ढोमणे, नीलिमा बावणे, वंदना यंगटवार, अनिता काशीकर, मनीषा धावडे, सारिका नांदुरकर, उषाकिरण शर्मा, दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, प्रगती पाटील, स्वाती आखतकर, माया फुलबांदे, राखी सिंगारे, उज्ज्वला राऊत आदींचा समावेश होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com