यापुढे वीज बिलासाठी आत्महत्या झाल्यास संघर्ष : चंद्रशेखर बावनकुळे 

आमच्या सरकारमध्ये ४५ लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष २८ हजार कोटी थकित झाले होते. पण आम्ही एकही कनेक्शन कापले नाही. या सरकारने चार महिन्यांचे प्रतिमहिना ३०० युनिट याप्रमाणे १२ युनिट वीज बिल माफ करावे,
Chandrashekhar Bawankule03
Chandrashekhar Bawankule03

नागपूर : वीज बिलासाठी आत्महत्या करणे, ही शरमेची गोष्ट आहे. आत्तापर्यंत १३०० पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही सरकारकडे वीज बिल माफ करण्याची मागणी करतो आहे. पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही. आता यापुढे वीज बिलासाठी एकही आत्महत्या झाली, तर भारतीय जनता पक्ष सरकारसोबत संघर्ष उभा करेल, असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला. 

शनिवारी यशोधरानगमध्ये राहणारे लीलाधर गायधने यांनी अवाढव्य वीज बिल आल्यामुळे आत्महत्या केली. त्यांना त्यांच्या दोन मजली घराचे वीज बिल तब्बल ४० हजार रुपये पाठवण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी बिल कमी करुन मिळावे, यासाठी वीज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजविले. पण काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी हताश होऊन त्यांनी शनिवारी दुपारी स्वतःच्या घरासमोरच जाळून घेतले. या घटनेने जनतेमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेबाबत चीड व्यक्त केली आहे. यापुढे वीज बिलासाठी आत्महत्या तर खपवून घेणार नाहीच, पण एखादा लाइनमन जरी कुणाच्या घरी वीज खंडीत करायला गेला, तर सरकारसोबत संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला. 

श्री बावनकुळे म्हणाले, आमच्या सरकारमध्ये ४५ लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष २८ हजार कोटी थकित झाले होते. पण आम्ही एकही कनेक्शन कापले नाही. या सरकारने चार महिन्यांचे प्रतिमहिना ३०० युनिट याप्रमाणे १२०० युनिट वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम्ही गेल्या चार महिन्यांपासून करतो आहे. पण त्यांनी अद्याप ते केले नाही. त्यामुळेच अशा आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. वीज बिलामुळे आत्महत्या करण्याची वेळ सरकारने जनतेवर आणली आहे. कारण कुठलाही सर्वसामान्य माणूस येवढे बिल भरुच शकत नाही. आजही वेळ गेलेली नाहीये. सरकारने चार महिन्यांचे प्रतिमहिना ३०० युनिटप्रणाणे १२०० युनिटचे वीज बिल माफ करावे आणि होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com