ईडी आणि सीबीआय या संस्थांना भाजपने शस्त्र बनवले… - bjp use ed and cbi as a weapons against their oppositions | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

ईडी आणि सीबीआय या संस्थांना भाजपने शस्त्र बनवले…

संजय डाफ
गुरुवार, 2 सप्टेंबर 2021

ईडीचे कार्यालय भाजप चालवत आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण आतापर्यंत भाजप सोडून इतर पक्षांच्या लोकांवरच चौकशी लावण्यात आली नाही. खरेच भाजपमध्ये एकही नेता असा नाहीये का की, ज्याने काहीच भ्रष्टाचार केला नसेल?

नागपूर : जो कुणी थोडाही भाजपच्या BJP विरोधात बोलला की, त्याच्यामागे ईडीचा ED ससेमिरा लावला जातो. महाराष्ट्रात तर अनेक नेत्यांना संपविण्याचे षडयंत्रच भाजपने चालवले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्येही आहेत, पण त्यांच्यावर अद्याप एकही चौकशी लागलेली नाही. ईडी आणि सीबीआय या संस्थांना भाजपने शस्त्र बनवले असल्याचा घणाघाती आरोप शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू Minister of State Bacchu Kadu यांनी केला. 

बच्चू कडू म्हणाले, ही देशातली पहिली घटना आहे की, राज्य सरकारने १२ जणांना आमदार करण्यासाठी नावे पाठवली आणि राज्यपालांनी त्याला येवढा विलंब लावला. सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही आमदार जाहीर न होणे, ही दुर्दैवी घटना आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा राज्यपालांवर काही दबाव आहे का, याची चौकशी आता झाली पाहिजे. ही निवड जर कायदेशीर नसेल, तर राज्यपालांनी नकार द्यायला पाहिजे होता. पण त्यांनी नकारही दिलेला नाही आणि घोषणाही केलेली नाही. आता राज्यपालांच्या अशा वागण्याची आणि एकुणच भूमिकेची चौकशी झाली पाहिजे.  

ही बातमी वाचा ः भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या निवास परिसरात ‘धूम स्टाईल’ने चोरली सोनसाखळी..

ईडीचे कार्यालय भाजप चालवत आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण आतापर्यंत भाजप सोडून इतर पक्षांच्या लोकांवरच चौकशी लावण्यात आली नाही. खरेच भाजपमध्ये एकही नेता असा नाहीये का की, ज्याने काहीच भ्रष्टाचार केला नसेल? ईडी आणि सीबीआय या आता संस्था राहिल्या नसून भाजपचे शस्त्र झाले आहे. कारण भाजपचे नेते पहिले इतर पक्षांच्या नेत्यांना धमक्या देत होते. पण आता उठसूठ कुणालाही धमक्या दिल्या जात आहे. परवा परवा भाजपचा एक नेता चक्क पोलिसांना किरीट सोमय्यांना सांगून तुमच्या मागे ईडी लावेन’, अशी धमकी देताना जनतेने वाहिन्यांवर पाहिला. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपविण्यासाठी ईडीचा वापर चालवला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असेही मंत्री कडू म्हणाले.  

ही बातमी पण वाचा ः नाना पटोले म्हणाले, महागाई हीच मोदी सरकारची डार्लिंग…

शाळांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत...
केरळच्या नंतर आता महाराष्‍ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आपण शाळा सुरू करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचतो आणि नेमके तेव्हाच कोरोना डोके वर काढतो. शिक्षण महत्वाचे आहेच, पण सोबतच आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे. शिक्षणाची बाब आपण थोडी मागेपुढे करू शकतो. कारण आरोग्य चांगले तर सर्व सुरळीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात सरकार घाई करणार नाही. मात्र येत्या दोन दिवसांत शाळा सुरू करायच्या की नाही, यावर निर्णय घेतला जाईल, असे बच्चू कडू म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख