२०१ विशेष निमंत्रितांसह भाजप महापालिका निवडणुकीसाठी सज्ज - bjp is ready for municipal elections with two hundred one special invitees | Politics Marathi News - Sarkarnama

२०१ विशेष निमंत्रितांसह भाजप महापालिका निवडणुकीसाठी सज्ज

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

तीन महामंत्री, २१ उपाध्यक्ष, सहा संपर्क प्रमुख, २० मंत्री आणि सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर भाजप महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. 

नागपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून अवकाश असला तरी सर्व प्रमुख पक्षांची तयारी मात्र सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहरअध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी अशा २०१ जणांचा समावेश विशेष निमंत्रितांमध्ये केला. त्यामुळे सर्वजण खूष आहेत. यासह तीन महामंत्री, २१ उपाध्यक्ष, सहा संपर्क प्रमुख, २० मंत्री आणि सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर भाजप महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. 

दटके यांच्या अष्टप्रधांनांमध्ये संजय बंगाले, रामभाऊ आंबुलकर, नरेंद्र (बाल्या) बोरकर- महामंत्री, सुनील मित्रा- संघटन महामंत्री, राजेश बागडी- कोषाध्यक्ष, वीरेंद्र कुकरेजा- सहकोषाध्यक्ष, आशिष मुकीम- सहकोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. 

हे आहेत उपाध्यक्ष 
भोजराज डुंबे, संदीप जाधव, आशिष वांदिले, विलास त्रिवेदी, अविनाश ठाकरे, जयप्रकाश पारेख, कृष्णा कावळे, संजय ठाकरे, सुधीर राऊत, किसन गावंडे, रमेश भंडारी, दिलीप गौर, महेंद्र राऊत, डॉ. कीर्तीदा अजमेरा, चेतना टांक, मार्टिन मॉरेस, संदीप गवई, संभाजी भोसले, अब्दुल कादीर, कामील अंसारी, रमेश सिंगारे. 

शहर संपर्क प्रमुख 
प्रमोद पेंडके, भोलानाथ सहारे, विजय आसोले, आशिष पाठक, अनिल मानापुरे 

मोर्चा अध्यक्ष 
नीता ठाकरे- महिला मोर्चा, पारेल पटले- युवा मोर्चा, राजेश हातीबेड- अ.जा. मोर्चा, डॉ. गिरीश चरडे- वैद्यकीय सेल, रमेश चोपडे- ओबीसी, किशोर भागडे- सहकार सेल, प्रदीप बिपटे- शिक्षक, अभय- देशमुख सांस्कृतिक सेल अशा ३४ मोर्चा व अभियान प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख