मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपची पोलिसांत तक्रार…

आमचे दैवत शिवाजी महाराजांना हार घालायला हा योगी चप्पल घालून जातो. वाटते तर असे की, तीच चप्पल घ्यावी आणि त्याच्या थोबाडात हाणावी.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपची पोलिसांत तक्रार…
Sarkarnama

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे Union Minister Narayan Rane यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर शिवसैनिकांनी महाराष्ट्रभर मोर्चे, आंदोलने करून विरोध केला. आज भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अपशब्द काढले. ‘आमचे दैवत शिवाजी महाराजांना हार घालायला हा योगी चप्पल घालून जातो. वाटते तर असे की, तीच चप्पल घ्यावी आणि त्याच्या थोबाडात हाणावी.’ असे ठाकरे यांनी म्हटल्याचा व्हिडिओ आज भाजपने व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावे, आशी मागणी भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केली आहे. 

काय लिहिले आहे पत्रात ?
पत्रामध्ये नितीन मुंदडा लिहितात, मुंबई येथे संपन्न होणा-या दसरा मेळाव्यात समाजामध्ये तेढ, असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात दंगली व्हाव्यात, या उद्देशाने उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विरोधात भडकावू भाषण देऊन, त्यांना समाजातील जमावाने मारहाण करून त्याची बेईज्जती करावी व समाजात कायमचे तेढ निर्माण होऊन दंगा निर्माण होऊन समाजाचे नुकसान व्हावे म्हणून चिथावणीखोर भाषण करून गुन्हा केल्या बाबत. १) मी धर्माप्रति अतिशय प्रगाढ श्रद्धा व विश्वास असलेला व भारत मातेशी समर्पित असलेला नागरिक आहे. २) उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. हिंदू धर्माचे प्रखर समर्थक आणि सर्व जीवन समाजाप्रति समर्पित केले आहे. ३) धर्माप्रति समर्पण केलेले महान नेते व मुख्यमंत्री आहेत. समाजामध्ये त्यांच्या प्रती अतिशय विश्वास, आदर व श्रद्धा असून ते आम्हास अतिशय पूजनीय आहेत. ४) आरोपी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून, ते शिवसेनाप्रमुख आहेत. परंपरेप्रमाणे दरवर्षी मुंबई येथे दसरा मेळावा संपन्न होत असतो आणि या मेळाव्याला शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असतात. 

सदरहू दसरा मेळाव्यात उध्दवजी ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या समस्त जनतेच्या भावना दुखावल्या. हिंदू धर्माच्या विरूद्ध असलेल्या इतर समाजातील लोकांना चिथावण्या देऊन दंगे निर्माण व्हावेत व त्यायोगे सामाजिक, धार्मिक तणाव व वितुष्ट निर्माण व्हावे या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे विरोधात अतिशय गलिच्छ व प्रक्षोभक हीन दर्जाचे शब्द वापरले. ‘योगी असेल तर तो मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, त्याने कोठेतरी गुहेत जाऊन बसायला पाहिजे तसेच त्यांनी त्याच भाषणात त्याला त्याच्याच चपला घेऊन थोबाडीत मारावे, असे चिथावणीखोर वक्तव्य केले. तसेच पुढे असेही खोटे व चिथावणीखोर वक्तव्य केले की, 'अरे तुझी महाराजाच्या समोर जायची लायकी तरी आहे काय, तसेच योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा एकेरी उपयोग करून त्यांच्या सन्मानास ठेव पोचविली. 

आमच्या सर्वांच्या भावनांना ठेच पोचविली व त्याही पुढे जाऊन असेही वक्तव्य केले की, 'योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, हा जो काही अपमान होतो आहे. तो केवळ योगीने नाही केला तर ते भाजपच रक्त आहे. भाजपच्या रक्तामध्ये चिंधमसारखी औलाद आहे. त्या औलादीनी तुमचं रक्त नासवून टाकल आहे.' अशा स्वरूपाच्या वक्तव्याने समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन दंगे निर्माण होण्याची भिती आहे. तरी नम्र विनंती की, श्री. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या गुन्ह्याची चौकशी करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी.’
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in