भाजप नेत्यांनी पोपटपंची बंद करावी, अन् द्यावा १५ वर्षांचा हिशेब...

चोवीस बाय सात योजना २०१८ पर्यंत पूर्णत्वास येणार होती पण ती का झाली नाही? लंडन स्ट्रीट १५ वर्षांपासून मनपाच्या अर्थसंकल्पाच्या कागदावरच का आहे?
भाजप नेत्यांनी पोपटपंची बंद करावी, अन् द्यावा १५ वर्षांचा हिशेब...
Vikas Thakre - Pravin Datke

नागपूर : आम्ही नागपूर २४ बाय ७ केले, असे गेल्या आठवड्यात सोनेगाव तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी म्हटले होते. नेमकी हीच बाब हेरत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे City President MLA Vikas Thakre यांना भाजप नेत्यांना आव्हान दिले आहे. आज शहराच्या कुठल्या भागात २४ बाय ७ पाणी मिळते, यांसह इतर प्रश्‍न ठाकरे यांनी विचारले आहेत. भाजपने गत १५ वर्षांचा हिशेब द्यावा, असेही ते म्हणाले. 

भारतीय जनता पक्षामुळेच नागपूर शहराचा विकास झाला या भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा हा एक भाग असला तरी विकास झाला म्हणणाऱ्या भाजपने आता जनतेला त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी आणि त्यानंतरच बक्षीस मागण्याची भाषा करावी, असेही ठाकरे म्हणाले.  

गेल्या पंधरा वर्षांपासून शहरात भाजप सत्तेवर आहे. या काळात विकासकामांच्या अनेक घोषणा केल्या पण त्यातील किती पूर्ण झाल्या हे भाजपने सांगावे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप नेत्यांनी पोपटपंची बंद करावी, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला. चोवीस बाय सात योजना २०१८ पर्यंत पूर्णत्वास येणार होती पण ती का झाली नाही? लंडन स्ट्रीट १५ वर्षांपासून मनपाच्या अर्थसंकल्पाच्या कागदावरच का आहे? यांसह एकूण २२ प्रश्न उपस्थित करीत त्यांचे उत्तर देण्याचे आव्हान कॉंग्रेस शहराध्यक्षांनी दिले. 

खालील प्रश्‍नांची उत्तरे भाजपने द्यावी...
- शहराच्या कोणत्या भागात चोवीस तास पाणी मिळते? 
- लंडन स्‍ट्रीटचे काय झाले? 
- पटर्वर्धन मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचे काय झाले? 
- ११५० कोटींचा सिवरेज प्रकल्प कधी होणार? 
- नाग नदीतून बोटी कधी धावणार? 
- स्कॅनियाने इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस परत का नेल्या? 
- अंबाझरी उद्यान मे. गरुडा कंपनीच्या घशात कोणी घातले? 
- स्मार्ट सिटी प्रकल्पातील ‘होम-स्वीट-होम’ होणार आहे की नाही? 
- गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, नाईक तलावांचे सौदर्यीकरणाचे काय झाले? 
- विधानसभानिहाय हॉस्पिटल उभारण्याच्या घोषणेचे काय?
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in