भाजपने विश्‍वासघात केला, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढणार पदवीधर निवडणूक ! - bjp betrayed graduate elections to be fought on the issue of independent vidarbha | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने विश्‍वासघात केला, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढणार पदवीधर निवडणूक !

मंगेश गोमासे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

आपण केलेल्या दौऱ्यांमध्ये विदर्भवाद्यांमध्ये चैतन्य असल्याचे ते म्हणाले. तसेच यातून विदर्भासाठी एक नवी चळवळ उभी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी काम करणाऱ्या संघटना व पक्षांनी त्यांना पाठींबा दिला असल्याचे रोंघे म्हणाले.

नागपूर : भारतीय जनता पक्षाने विश्‍वासघात केला. विदर्भाच्या नावावर मते मागून वैदर्भीयांची फसवणूक केली. त्यामुळे आता त्यांचा भंडाफोड करणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढणार असल्याचे स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाचे उमेदवार नितीन रोंघे यांनी आच पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
नितीन रोंघे म्हणाले, भाजपाने विदर्भाच्या नावावर मत मागून येथील युवक आणि जनतेची फसवणूक केली. विशेष म्हणजे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विदर्भाच्या तरुणांना नोकरी मिळू नये, यासाठीच प्रयत्न केले. आजही विदर्भातील युवक बेरोजगार आहेत. येथे उद्योग नाहीत. त्यामुळे युवकांचे मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील औष्णिक वीज प्रकल्पामुळे नागपूर आणि चंद्रपूरमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा याही मुद्द्याकडे येथील पदवीधरांचे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. 

आपण केलेल्या दौऱ्यांमध्ये विदर्भवाद्यांमध्ये चैतन्य असल्याचे ते म्हणाले. तसेच यातून विदर्भासाठी एक नवी चळवळ उभी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी काम करणाऱ्या संघटना व पक्षांनी त्यांना पाठींबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ॲड. मुकेश समर्थ, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, राजकुमार तिरपुडे, प्रमोद पांडे, राजेश काकडे, डॉ. महेंद्र धावडे व पदाधिकारी उपस्थित होते.       

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख