‘मदतीचा एक घास’; चंद्रपूर जिल्ह्यात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली सुरुवात...

एक आई, एक बहीण, एक गृहिणी आणि अन्नपूर्णांचा वसा काँग्रेसच्या महिला पूर्ण करू शकतात, हे आज त्यांनी दाखवून दिले. आज आपल्या महिला नेत्या स्वयंपाकघरात शिरल्या आहेत. जनतेच्या मदतीसाठी तर कार्यकर्तेही कंबर कसून कामाला लागले आहेत.
Pratibha Dhaorkar
Pratibha Dhaorkar

नागपूर : कोरोनामुळे संपूर्ण देशात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. The question of health has arisen कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. Has been locked down या लॉकडाऊनने लोकांच्या पोटाला देखील लॉक लागला आहे. लोकांच्या हाताचे काम गेल्याने अनेक लोक अर्धपोटी, तर काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. Some people are starving या परिस्थितीवर मात करण्यासाठी महिला प्रदेश कॉंग्रेसने Mahila Pradesh Congress ‘मदतीचा एक घास’, हा उपक्रम सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आमदार प्रतिभा धानोरकर In Chandrapur District MLA Pratibha Dhanorkar यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. 

कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भुकेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष मदत करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून हा नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे.  महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष श्रीमती संध्या सव्वालाखे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाची सुरुवात झाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः स्वयंपाक करून गरजू लोकांना डबे दिले. कॉग्रेसच्या सर्व महिलांनी पुढे येऊन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. 

एक आई, एक बहीण, एक गृहिणी आणि अन्नपूर्णांचा वसा काँग्रेसच्या महिला पूर्ण करू शकतात, हे आज त्यांनी दाखवून दिले. आज आपल्या महिला नेत्या स्वयंपाकघरात शिरल्या आहेत. जनतेच्या मदतीसाठी तर कार्यकर्तेही कंबर कसून कामाला लागले आहेत. ‘मदतीचा एक घास’  महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून राबवण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे आता गरजू लोकांना मिळणार  आहे घरचे जेवण, आपण घरात ज्या पोळ्या करतो त्यात रोज १० पोळ्या जास्त करायच्या आणि पावभर भाजी जास्त करायची. आशा ४० ते ५० पदाधिकारी महिलांनी पोळ्या आणि भाजी जमा केल्या तर रोजच्या ४०० ते ५०० पोळ्या होतील. या आम्ही  एखाद्या संस्थेला किंवा महिला आघाडीच्या बॅनरखाली लोकांना देणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुरुवात केली आहे. 

काय आहे 'मदतीचा एक घास' उपक्रम?
थेंबे थेंबे तळे साचे, घरच्या गृहिणी घरी रोज स्वयंपाक करत असतात, त्याच स्वयंपाकातील प्रत्येक महिला काँग्रेस कार्यकर्त्याने दहा ते बारा चपात्या अधिक करून हा डबा गरजू लोकांना पोचवायचा आहे. हा उद्देश या उपक्रमाचा असून त्यासाठी एक केंद्र तयार करून सर्व जमलेले डबे गरजू लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com