नागपूर शहर पोलिस दलात लवकरच होणार मोठे फेरबदल ! 

काही ठाणेदारांच्या कार्यप्रणालीवर वरिष्ठ नाराज असल्यामुळे बदल्या करून त्या ठाण्यांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्‍ती होऊ शकते. तसेच काही वादग्रस्त ठाणेदारांमुळे पोलिस खात्याची बदनामी झालेली आहे. त्यामुळे अशा ठाणेदारांनाही बदलण्यात येण्याची शक्‍यता आहे.
police logo
police logo

नागपूर : कोरोनाची स्थिती उद्भवल्यामुळे थांबलेल्या शहर पोलीस दलातील बदली प्रक्रियेला आता वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन सत्ताधारी दोन पक्षांत वाद झाले असले तरी नागपूर शहर पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. काही अधिकाऱ्यांनी ठाणेदारी मिळविण्यासाठी फिल्डींगसुद्धा लावल्याची माहिती आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस दलातील अनेक पोलिस निरीक्षक सध्या "डम्पींग यार्ड' म्हणजे साईड पोस्टिंगमध्ये काम करीत आहेत. तर काही ज्युनियर अधिकारी हे ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलात पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. शहरातील काही पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांचा कार्यकाळ संपत आला असूनही ते अजुनही ठाण्यांमध्ये "फेव्हिकॉल' प्रमाणे चिकटूनच आहेत. तर काहींना साईड ब्रॅंचमध्ये वर्षानुवर्षे ठेवले जात आहे. नुकताच प्रमोशन मिळालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनीसुद्धा ठाणेदारी मिळविण्याच्या शर्यतीत भाग घेतला आहे. 

काही ठाणेदारांच्या कार्यप्रणालीवर वरिष्ठ नाराज असल्यामुळे बदल्या करून त्या ठाण्यांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्‍ती होऊ शकते. तसेच काही वादग्रस्त ठाणेदारांमुळे पोलिस खात्याची बदनामी झालेली आहे. त्यामुळे अशा ठाणेदारांनाही बदलण्यात येण्याची शक्‍यता आहे. काही ठाणेदारांच्या अनेक तक्रारी पोलिस आयुक्‍त तसेच पोलिस उपायुक्‍तांकडे झाल्या आहेत. सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारींची आयुक्‍तांनीही दखल घेतली आहे. त्यामुळे काही ठाणेदार डम्पींग यार्डमध्ये जाण्याची शक्‍यता आहे. तर काही नवीन पोलिस निरीक्षकांना नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची संकेत वरिष्ठांच्या कार्यालयातून मिळाले आहेत. 

वाहतूक शाखेतही होणार बदल ! 
पोलिस निरीक्षकांच्या बदल्यासह वाहतूक शाखेतही मोठे फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांची बदली वाहतूक शाखेत होण्याचे संकेत आहेत. तर वाहतूक शाखेतील वादग्रस्त अधिकाऱ्यांना कात्री लागू शकते. वाहतूक शाखेत वादग्रस्त असलेल्या अधिकाऱ्यांना कंट्रोल अटॅच होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com