मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच उद्दाम, मोकाट सुटलेत भास्कर जाधव...

भास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीचे अनेक दाखले याआधीही महाराष्ट्रास मिळाले आहेत आणि असे असतानाही मुख्यमंत्री सातत्याने त्यांची पाठराखण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आमदार जाधव यांचा उद्दामपणा मोकाट सुटला आहे.
Bhaskar Jadhav - Uddhav Thackeray.
Bhaskar Jadhav - Uddhav Thackeray.

नागपूर : शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव MLA of Guhagar Bhaskar Jadhav  यांनी संकटग्रस्त महिलेला आज जी वागणूक दिली, ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. ज्या उद्दामपणे ते बोलत होते, ते मुख्यमंत्र्यांनीसुद्धा पाहिले. पण जाधवांनी कुठलीही समज त्यांनी दिली नाही, तर त्यांच्या इशाऱ्यावरून कुठल्याही मदतीची घोषणा न करता उद्धव ठाकरे The chief Minister Uddhav Thackeray तेथून हात हालवत निघून गेले. मुख्यमंत्र्यांमुळे जाधव असे उद्दाम सुटले आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार Ashwini Jichkar यांनी केला आहे. 

संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचा कांगावा करून प्रत्यक्षात मात्र जनतेच्या दुःखाची कुचेष्टा करणारे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यादेखत महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागावी आणि सत्तेचा माज दाखवून सामान्य जनतेच्या दुःखावर मीठ चोळणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी अश्विनी जिचकार  यांनी केली आहे. जाधव यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभरातील महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये, असाच त्यांच्या उद्दाम वागण्याचा इशारा होता. हे त्या प्रसंगाच्या व्हिडिओमधून राज्यभरातील जनतेस कळून चुकले आहे. मुख्यमंत्र्यांदेखत असा उद्दामपणा करूनही त्यांना कोणतीच समज न देता उलट त्यांच्याच इशाऱ्यावरून तेथून काढता पाय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या वागण्याचे समर्थनच केले आहे. संकटग्रस्तांबाबत सरकार संवेदनाहीन असल्याचेच जाधवांनी दाखवून दिले आहे. 

संपूर्णपणे उध्वस्त झालेल्या संकटग्रस्तांना तातडीची मदत देणे तर दूरच, मदतीची घोषणादेखील न करता हात हालवत परतणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांच्या माध्यमातून बेजबाबदारपणाचे जाहीर दर्शन घडविले आहे. तुमच्यावर कोसळलेल्या दुःखातून तुम्हीच स्वतःच सावरा, असा त्रयस्थ सल्ला देऊन संकटग्रस्तांच्या वेदनांवर मीठ चोळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांच्यासारख्या उद्दाम आमदाराचा जनतेच्या अपमानासाठी वापर करून घेतल्याने मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असेही श्रीमती जिचकार म्हणाल्या. 

भास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीचे अनेक दाखले याआधीही महाराष्ट्रास मिळाले आहेत आणि असे असतानाही मुख्यमंत्री सातत्याने त्यांची पाठराखण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आमदार जाधव यांचा उद्दामपणा मोकाट सुटला आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com