बावनकुळे म्हणाले, नाना पटोलेंची स्वबळाची भाषा म्हणजे निव्वळ नौटंकी..

या सरकारने विधानमंडळाचा राजकीय वापर केला आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत खोटं बोलत आहेत. आरक्षण द्यायचे नसेल तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तसे स्पष्ट सांगावे. पण असे खोटे धंदे करू नये.
Chandrashekhar Bawankule - Nana PatoleChandrashekhar Bawankule - Nana Patole
Chandrashekhar Bawankule - Nana PatoleChandrashekhar Bawankule - Nana Patole

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. ‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, असा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण खळबळ उडवून दिल्याचेही सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात खळबळ वगैरे काही नाही, तिन्ही पक्ष मिळून चांगली नौटंकी करत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. या सरकारमधील एकही जण विकासाची भाषा करताना दिसत नाही. No one in this government is seen पण speaking the language of developement दररोज नवीन नवीन भानगडी मात्र करत असतात, एकाही नेत्याला विकासाचे व्हिजन नाही. विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करून ठेवले, महाराष्ट्र विकास मंडळ बंद केले, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekha Bawnakule म्हणाले.

बैठका आणि जेवणाच्याच चर्चा
नाना पटोले काही म्हणतात आणि कॉंग्रेसचे नेते शरद पवारांकडे जाऊन बैठक घेतात. तिकडे मुख्यमंत्र्यांकडे वेगळी बैठक तर उपमुख्यमंत्र्यांच्या वेगळ्याच बैठकी सुरू असतात. मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला जेवायला बोलवा. हे काय चालले आहे महाराष्ट्रात. निव्वळ राजकारण सुरू आहे. इकडे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना यांच्या आपसातल्याच भानगडी संपत नाहीये. हे सर्व निवडणुकीच्या वेळी त्यांनी करावे. पण आता काम करण्याची वेळ आहे, तर जनतेसाठी ठोस काम त्यांनी करावे, अशा प्रकारे टाईमपास करू नये, असे बावनकुळे म्हणाले. 

‘त्या’ सरकारच्या काळात इम्पेरिकल डाटामध्ये ६९ लाख चुका
महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाहीये. म्हणून तिन्ही पक्ष वेगवेगळी भूमिका मांडून समाजाची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. ५ जुलै २०२१ ला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, ३ जुलै २०१५ ला केंद्र सरकारने राज्य सरकारला जे पत्र पाठवले, त्यामध्ये केंद्राने स्पष्ट म्हटले आहे की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना इम्पेरिकल डाटामध्ये ६९.१ लाख चुका झाल्या होत्या. त्यामुळे हा डाटा ओबीसी आरक्षणासाठी वापरू नये. त्यामुळे आता राज्य सरकारने नवीन डाटा तयार करावा आणि तीन महिन्यांच्या आत ओबीसींना आरक्षण द्यावे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे सांगितले.

या सरकारने विधानमंडळाचा राजकीय वापर केला आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत खोटं बोलत आहेत. आरक्षण द्यायचे नसेल तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तसे स्पष्ट सांगावे. पण असे खोटे धंदे करू नये. भविष्यात ओबीसी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ओबीसी जनतेची दिशाभूल करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात मांडलेलं वाक्य न वाक्य ओबीसींना आरक्षण मिळावे, याकरिता आहे. ३१ जुलै २०१९ चा अध्यादेश जर पाहिला तर ही बाब स्पष्टपणे लक्षात येईल. ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावं, अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि तसा वटहुकूम काढल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. फडणवीस सरकारने काढलेला वटहुकूम रद्द करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे. काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचे काम केले.    
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com