बावनकुळेंनी ‘या’साठी केले राज ठाकरेचे अभिनंदन !  - bavankule congratulates raj thackeray for this | Politics Marathi News - Sarkarnama

बावनकुळेंनी ‘या’साठी केले राज ठाकरेचे अभिनंदन ! 

अतुल मेहेरे
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारच्या बेताल कारभारामुळे स्वतः ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हतबल झाले आहेत. आम्ही सरकारमध्ये असताना ४५ लाख शेतकऱ्यांना फुकट वीज दिली होती. गरींब जनतेची, शेतकऱ्यांची वीज कापण्याचे पाप आम्ही केले नाही. ५० हजार कोटींची थकबाकी करून ठेवल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. हो… केली आम्ही ५० हजार कोटींची थकबाकी.

नागपूर : वाढीव वीज बिलाने राज्यातील जनता त्रस्त आहे. लोकांनी वाढीव वीज बिल भरू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने राज्यातील जनतेला केले आहे. नेमकी हीच भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली आहे. यासाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केले आहे. 

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ‘वाढीव वीज बिल भरू नका’, असे आवाहन नागरिकांना केले आहे. वाढीव वीज बिलाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. वाढीव वीज बिलाबाबत राज्य सरकारने सोमवारपर्यंत निर्णय घ्यावा, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे. मनसेच्या या भूमिकेचे चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वागत केले आहे. यासंदर्भात श्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील ९५ लाख लोकांची वीज जोडणी कापण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. हे करताना राज्यातील ५ कोटी लोक प्रभावित होणार आहेत. पण आम्ही हे होऊ देणार नाही. ज्या-ज्या ठिकाणी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी वीज कापायला जातील, तेथे आम्ही भाजपचे झेंडे घेऊन जाऊ आणि त्यांना विरोध करू. 

हो... के५० हजार कोटींची थकबाकीली
राज्य सरकारच्या बेताल कारभारामुळे स्वतः ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हतबल झाले आहेत. आम्ही सरकारमध्ये असताना ४५ लाख शेतकऱ्यांना फुकट वीज दिली होती. गरींब जनतेची, शेतकऱ्यांची वीज कापण्याचे पाप आम्ही केले नाही. ५० हजार कोटींची थकबाकी करून ठेवल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. हो… केली आम्ही ५० हजार कोटींची थकबाकी, पण स्वतःचे घर भरण्यासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी आणि गरीबांना दिलासा देण्यासाठी केली. त्यातील २८ हजार कोटी केवळ आणि केवळ शेतकऱ्यांसाठी वापरल्याचे श्री बावनकुळे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख